Seema Bisla
Seema Bisla  twitter
क्रीडा

Tokyo Olympics: सीमानंही मिळवलं टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट

सुशांत जाधव

World Olympic Wrestling Qualifiers : भारतीय महिला कुस्तीपटू सीमा बिस्लाने (Seema Bisla ) 50 किलो वजनी गटात ऑलिम्पिंकचे तिकीट मिळवले आहे. ऑलिम्पिक रेसलिंग क्वालिफिकेशन स्पर्धेत तिने युरोपीय चॅम्पियनशिप स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या पोलंडच्या अन्न लुकासियाक हिला 2-1 पराभूत करत ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. यापूर्वी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (53 किलो) , अंशु मलिक (57 किलो) आणि सोनम मलिक (62 किलो) वजनी गटातून ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती.

वर्ल्ड ऑलिम्पिक रेसलिंग क्वालिफिकेशन इव्हेंटमध्ये ऑलिम्पिकचे तिकिट मिळवणारी सीमाही दुसरी भारतीय ठरली. यापूर्वी पुरुष गटातून सुमीत मलिक याने 125 किलो वजनी गटात ऑलिम्पिक तिकीट मिळवले होते. आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या सीमा हिने बेलारूसच्या अनास्तासिया यानोतवा हिला 8-0 आणि 2018 मधील स्विडनची यूथ ऑलिम्पिक चॅम्पियन एम्मा जोन्ना मालमग्रेन हिला 10-2 असे पराभूत करुन पहिल्या चारमध्ये प्रवेश केला होता.

आतापर्यंत कुस्ती कुस्ती क्रीडा प्रकारातून आठ भारतीयांनी ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध केली आहे. यात चार महिलांचा समावेश असून पुरुष गटातून चौघांनी ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे.

महिला कुस्तीपटू

सीमा बिस्ला (50 किलो), विनेश फोगाट (53 किलो), अंशू मलिक (57 किलो), सोनम मलिक (62 किलो)

पुरुष गटातून पात्र झालेले मल्ल

रवि कुमार दाहिया (57 किलो), बजरंग पुनिया (65 किलो), दीपक पुनिया (86 किलो, सुमित मलिक (125 किलो)

Olympic Wrestling Qualifiers Indian wrestler Seema Bisla secures Tokyo Olympics berth

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

Pune-Delhi Flight : विमानाला धडक, चौकशीसाठी पथक;‘डीजीसीए’चे तीन सदस्य पुण्यात दाखल

VIDEO: "निवडणूक संपली, प्रचार संपला!"; रितेश आणि जिनिलियाचा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

SCROLL FOR NEXT