vinesh phogat  Instagram
क्रीडा

Olympics : 'जखमी वाघीण' पदकाचं स्वप्न साकार करण्याची अपेक्षा

पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पदाकाच्या दिशेने वाटचाल सुरु असताना दुखापतीमुळे तिला आखाड्यातून बाहेर पडावे लागले.

सुशांत जाधव

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट आखाड्यात 'दंगल' करण्यासाठी सज्ज आहे. पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पदाकाच्या दिशेने वाटचाल सुरु असताना दुखापतीमुळे तिला आखाड्यातून बाहेर पडावे लागले. आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीमध्ये अनोखी स्क्रीप्ट लिहिणाऱ्या महावीर फोगट यांच्या लेकीच्या खात्यात जर कशाची कमी असेल तर ती म्हणजे ऑलिम्पिक पदकाची. गत ऑलिम्पिकमधील दुखापत भरली असली तरी ऑलिम्पिक पदक हुकल्याची खंत कुठेतरी तिच्या मनात घर करुन आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी जखमी वाघीन बनून महावीर फोगट यांची लेक आखाडा गाजवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. (olympics 2020 medal predictiont wrestler vinesh phogat has-won 13th medals on international leval dream for olympics medal)

राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक विजेत्या 26 वर्षीय विनेश फोगट दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. आपल्या वजनी गटात जगातील अव्वल क्रमांकावर असलेली पैलवान विनेश फोगटने यावर्षी सातत्याने मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. हरियाणाच्या भिवानी या छोट्याशा गावातील पराक्रमी विनेशने मागील वर्षी कझाकिस्तानमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. टोकियो स्पर्धसाठी पात्र ठरणारी ती पहिली महिला पैलवान ठरली होती.

विनेशला यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत दोन वेळा जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणाऱ्या मायू मुकाइडा हिचे कडवे आव्हान पेलावे लागले. चौथ्या फेरीत विनेश आणि जपानी महिला पैलवान यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळू शकेल.

विनेशची आतापर्यंतची कामगिरी ही दिमाखदार अशीच राहिली आहे. वेगवेगळ्या स्पर्धेत तिने देशासाठी 13 पदके जिंकली आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक, राष्ट्रकुल स्पर्धेत 2 सुवर्ण आणि आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकाची कमाई केलीये.

या कामगिरीमुळेच विनेशला पदकाची प्रबळ दावेदार मानले जात आहे. विनेश फोगटने 48, 50 आणि 53 अशा वेगवेगळ्या गटात देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आव्हानात्मक लढतीत प्रतिस्पर्ध्याला धोबीपछाड देत तिने आपल्यातील ताकद वेळोवेळी दाखवून दिली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत ती पदक मिळवून नवा इतिहास रचण्याच्या इराद्यानेच आखाड्यात उतरेल.

रुपेरी पडद्यावरील विनेश फोगटची प्रेरणादायी कहाणी

विनेश फोगट हिला कुस्तीचा वारसा लाभलाय. बॉलिवूडमध्ये दंगल चित्रपटाच्या माध्यमातून तिचा प्रेरणादायी प्रवास भारतीयांनी पाहिला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक नवा अध्याय लिहिण्यासाठी ती उत्सुक असेल. गत ऑलिम्पिकमध्ये 53 किलो फ्रीस्टाइल वजनी गटात तिच्याकडून पदकाची आशा होती. ती क्वार्टर फायनलपर्यंत पोहचली. पण या लढतीवेळी तिच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि पदकाचे स्वप्न भंग उद्धवस्त झाले. या दुखापतीनंतर तिला स्ट्रेचरवरुन बाहेर नेण्यात आले. 5 महिन्यांच्या विश्रांतीनंतर ती पुन्हा आखाड्यात उतरली. मॅटवर दमदार पदार्पण करत स्वप्न साकार झाल्याशिवाय थांबणार नाही, असेच संकेत तिने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT