Pakistan vs Australia, 3rd Test | David Warner vs Shaeen Afridi Team eSakal
क्रीडा

Video : शाब्बास! बोल्ड झाल्यावर वॉर्नरनं थोपटली अफ्रिदीची पाठ

सुशांत जाधव

Pakistan vs Australia, 3rd Test: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना लोहोरच्या मैदानात सुरु आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत होता. पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून त्यांनी बिन बाद 73 धावा केल्या आहेत. अजूनही त्यांना 278 धावांची गरज आहे. या सामन्यात दोन्ही संघातील स्टार खेळाडूंच्यातील जुगलबंदी हा चर्चेचा विषय ठरत आहे. पाकिस्तान जलदगती गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) याने चौथ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याला क्लिन बोल्ड केल्याचे पाहायला मिळाले.

आफ्रिदीने वॉर्नरला जो चेंडू टाकला होता तो कमालीचा असाच होता. बोल्ड झाल्यानंतरही वॉर्नर डिफेन्स पोझमध्य काही काळ मैदानात थांबल्याचे दिसले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. वॉर्नरला बोल्ड केल्यानंतर आफ्रिदी त्याच्यासोत संवाद करतानाही दिसला. वॉर्नरने तंबूत जाता जाता आफ्रिदीच्या पाठिवर थाप मारत शाब्बासकी देखील दिली.

तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर वॉर्नर वर्सेस आफ्रिदी यांच्यात खुन्नस पाहायला मिळाली होती. यासंदर्भात सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर वॉर्नरनं अर्धशतक झळकावलं. पण तो फार काळ मैदानात तग धरु शकला नाही . ऑस्ट्रेलियाच्या डावातील 29 व्या षटकात आफ्रिदीनं वॉर्नरला बोल्ड केलं. डेव्हिड वॉर्नरने दुसऱ्या डावात 91 चेंडूत 51 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 3 बाद 227 धावांवर घोषित करत पाकिस्तानसमोर 351 धावांचे आव्हान ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT