Pakistan Announce Squad t20 Series Against New Zealand sakal
क्रीडा

टी-20 संघाची घोषणा! बदलला कर्णधार; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kiran Mahanavar

Pakistan Announce Squad t20 Series Against New Zealand : टी-20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडसोबत मालिका खेळणार आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज या टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. बाबर आझमने पुन्हा एकदा पाकिस्तान संघाचे कर्णधारपद स्वीकारले आहे.

शाहीन आफ्रिदीला याआधीच पांढऱ्या चेंडू क्रिकेटच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर बाबर आझम पुन्हा एकदा कर्णधार करताना दिसणार आहे.

मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम यांनी काही दिवसांपूर्वीच आपली निवृत्ती मागे घेतली होती. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचे घोषित केले. तर वेगवान गोलंदाज हरिस रौफ या मालिकेसाठी उपस्थित नाही. पाकिस्तान सुपर लीगदरम्यान हरिस रौफच्या खांद्याला दुखापत झाली होती. हरिसची दुखापत अद्याप बरी झालेली नाही.

दहा दिवसांच्या या मालिकेतील तीन सामने रावळपिंडीत तर दोन सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचे व्यवस्थापक वहाब रियाझ यादरम्यान म्हणाले की, आम्ही युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिजमध्ये 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तयारी करत असताना, ही मालिका पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाची आहे. केवळ न्यूझीलंडच्या मजबूत संघावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, आमचे उद्दिष्ट आत्मपरीक्षण करणे आणि सुधारणेसाठी क्षेत्रे ओळखणे हे आहे. मला आशा आहे की खेळाडू त्यांना मिळालेल्या संधींचा फायदा घेत वर्ल्ड कपसाठी आपली जागा मजबूत करतील.

न्यूझीलंड मालिकेसाठी पाक संघ - बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, मोहम्मद अमीर, इरफान खान, नसीम शाह, सईम अयुब, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर. उस्मान खान, जमान खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT