Pakistan vs New Zealand sakal
क्रीडा

PAK vs NZ: पाकिस्तान फाइनलमध्ये भारताचा विजय निश्चित! 15 वर्ष जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती

13 वर्षांनंतर पाकिस्तानने टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली, न्यूझीलंडचा सात गडी राखून केला पराभव...

Kiran Mahanavar

Pakistan vs New Zealand: टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला उपांत्य सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने एकतर्फी विजय नोंदवत अंतिम फेरीत धडक मारली. पाकिस्तानने अंतिम फेरी गाठल्याने टीम इंडियाच्या चॅम्पियन बनण्याच्या आशाही वाढल्या आहेत. 2007 मध्येही टी-20 वर्ल्डचा फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला होता, तेव्हा टीम इंडियाने बाजी मारली होती, तरीही टीम इंडियाला सध्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी इंग्लंडला हरवायचे आहे.

न्यूझीलंडने या उपांत्य फेरीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाहीन शाह आफ्रिदीच्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडला 4 बाद 152 धावांवर रोखले. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने 35 चेंडूत नाबाद 53 आणि कर्णधार केन विल्यमसनने 42 चेंडूत 46 धावा करत धावसंख्या 150 च्या पुढे नेली. नशिबाच्या जोरावर उपांत्य फेरी गाठणाऱ्या पाकिस्तानी संघाचा आजचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला.

सलामीवीर बाबर-रिझवान यांनी संघाला 153 धावांचे लक्ष्य सोपे केले. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आणि 100 हून अधिक धावांची भागीदारीही केली. बाबर आझमने 42 चेंडूत 53 धावा केल्या. टी-20 विश्वचषकातील हे त्याचे पहिले अर्धशतक होते. त्याचवेळी मोहम्मद रिझवानने 43 चेंडूत 57 धावांची खेळी केली.

टी-20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. 10 नोव्हेंबरला भारताचा सामना अॅडलेड ओव्हलवर इंग्लंडशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ 13 नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळेल. भारत, पाकिस्तान आणि इंग्लंड संघांनी आतापर्यंत 1-1 वेळा टी-20 विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT