Shadab Khan Amazing Catch sakal
क्रीडा

Pak vs Wi: पाकच्या उपकर्णधार शादाबचा 'शानदार' कॅच; Video होतोय व्हायरल

पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खानने सामन्यात आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Kiran Mahanavar

PAK vs WI : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्या मध्ये 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना काल खेळल्या गेला. पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव करत मालिकेत विजयाने सुरुवात केली. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 305 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने शतक झळकावत संघला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला. पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खानने सामन्यात आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शादाबने एक अप्रतिम झेल घेतला आणि अखेरीस तो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. (Shadab Khan Amazing Catch)

वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज काइल मेयर्स हा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा बळी ठरला तो 8 चेंडूत 3 धावा करू शकला. विंडीज संघाला पहिला धक्का तिसऱ्या षटकात बसला. त्यामुळे संघाची सुरुवात चांगली झाली नाही. शाई होप आणि शेमराह ब्रूक्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी 154 धावांची मोठी भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.

पाकिस्तान डावखुरा फिरकी गोलंदाज गोलंदाज मोहम्मद नवाज यांनी वेस्ट इंडिजच्या डावातील 31 वे षटक टाकत होता. च्या चेंडूवर ब्रुक्सने मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू बॅटला लागला आणि शॉर्ट थर्ड मॅनकडे गेला. येथे उभ्या असलेल्या शादाब खानने धावत एका हाताने अप्रतिम झेल घेतला. ब्रुक्स 83 चेंडूत 70 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. सलामीवीर शाई होपने 127 धावा केल्या. वेगवान गोलंदाज हारिस रौफने ७७ धावांत सर्वाधिक ५ बळी घेतले.

पाकिस्तानकडून बाबर आझमने 107 चेंडूत 103 धावा केल्या, आणि सलग तिसऱ्या वनडेत त्याने शतक झळकावले. यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननेही ५९ धावा केल्या. शेवटी खुशदिल शाहने 23 चेंडूत 41 धावा करत विजय निश्‍चित केला. मालिकेतील दुसरा सामना 10 जून रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT