Brother Kamran Akmal Criticize Babar Azam esakal
क्रीडा

Babar Azam : बाबर घर का न घाट का! इतरांचे सोडा घरच्यांनी देखील घेतलं तोंडसुख

अनिरुद्ध संकपाळ

Brother Kamran Akmal Criticize Babar Azam : पाकिस्तानने झिम्बाब्वेविरूद्धचा सामना अवघ्या 1 धावेने गमावल्यानंतर कर्णधार बाबर आझमवर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सपाटून टीका करत आहेत. पाकिस्तान या पराभवानंतर सुपर 12 मधूनच गाशा गुंडाळण्याच्या स्थितीत पोहचला आहे. या खराब कामगिरीचे खापर बाबर आझमच्या डोक्यावर फोडण्यात येत असून आता घरच्या व्यक्ती देखील त्याच्यावर तोंडसुख घेत आहेत. पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने बाबर आझमने टी 20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिला आहे.

बाबर आझमचा मोठा चुलत भाऊ असलेला कामरान अकमलने एआरवाय न्यूजशी बोलताना बाबरला कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिला. कामरान अकमलने पाकिस्तानकडे टी 20 वर्ल्डकपमध्ये कोणती रणनिती दिसून आलेली नाही अशी टीका केली. तो म्हणाला, 'तुम्ही संघात हैदर अलीला संघात घेतलं आहे मात्र त्याच्या फलंदाजीच्या क्रमांकाबाबत तुम्ही गोंधळलेले आहात. गेल्या सामन्यात आपण एकदम खराब क्रिकेट खेळलो. आपण सुमार दर्जाचे क्रिकेट खेळलो असतो तरी आपण मागच्या सामन्यातील धावा चेस केल्या असत्या.'

कामरान अकमल पुढे म्हणाला की, 'एक मोठा भाऊ म्हणून बाबर मला काही समजत असेल तर किंवा पीसीबी माझ्या सल्ल्याला काही महत्व देत असेल तर माझ्या मते या वर्ल्डकपनंतर बाबर आझमने कर्णधारपद सोडावे. जर तुम्हाला बाबरकडून 22000 ते 25000 हजार धावा करून घ्यायच्या असतील तर बाबरला फक्त खेळाडू म्हणून संघात ठेवा. जर असे झाले नाही तर त्याची कामगिरी खालावत जाईल. जर बाबर आणि माझे काका मला काही समजत असतील तर त्यांनी कर्णधारपद सोडून द्यावे. तो संघात फक्त एक खेळाडू म्हणून खेळावा. असं झालं तरच तो विराट कोहलीसारखी आपली कारकिर्द पुढे नेऊ शकतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

विसर्जन न होताच परतणार गणरायाची मूर्ती, असा निर्णय घेण्यामागची मंडळाची नेमकी भावना काय? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : जुहू चौपाटीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी येण्यास सुरुवात

Ganpati Visarjan 2025 Live Updates : परळचा महाराजा विसर्जनासाठी मार्गस्थ

Daund Crime : दौंड येथे तरूणाचा निर्घृण खून; चार संशयित आरोपी ताब्यात

SCROLL FOR NEXT