pakistan cricket board chief Najam Sethi 
क्रीडा

Asia Cup 2023: जय शहाच्या 'या' कृत्याने PCB अध्यक्ष संतापले! पाक चाहते म्हणाले, 'पंगा घेऊ नका, आपल्यात ताकद ...'

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी हे चक्रावून गेले. रागाच्या भरात त्यांनी केलेल्या ट्विटवरून ते लढण्यास तयार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

मात्र, त्याच्या ट्विटवर पाकिस्तानचे लोक नजम सेठी यांना सल्ला देत आहे, त्याच्याशी पंगा नका, कारण पाकिस्तान अजून एवढी मोठी शक्ती बनलेला नाही. खरं तर जय शहा यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे कॅलेंडर जारी केले, त्यानंतर पीसीबी प्रमुखांनी त्यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. (Najam Sethi left furious as Jay Shah announces Asia Cup calendar)

जय शहा हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांनी पुढील 2 वर्षांचे वेळापत्रक जाहीर केले, ज्यामध्ये 2023 आणि 2024 मध्ये आशियातील मोठ्या स्पर्धांचे वेळापत्रक आहे.

मात्र, जय शहा यांचे हे पाऊल नजम सेठी यांना आवडले नाही आणि ते संतापले. त्यांनी ट्विट करून लिहिले की, आशियाई क्रिकेट परिषदेचे एकतर्फी कॅलेंडर आणि संरचना जारी केल्याबद्दल जय शाह यांचे आभार. तुम्ही पाकिस्तानमध्ये होणार्‍या आशिया कप 2023 चे कॅलेंडर देखील जारी केले. आता तुम्ही इतके केले आहे, तर PSL 2023 चे कॅलेंडर देखील प्रकाशित करा.

नजम सेठी यांनी जय शहावर निशाना साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण ते येथेच अडकले. त्याचेच लोक त्यांना पंगा घेऊ नका असा सल्ला देत आहेत. पाकिस्तानचे लोक म्हणाले की, सेठीसाब, पंगा घेऊ नका, तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. आपण आता इतके मोठे शक्ती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Virat Kohli Santa Video : विराट कोहली नाताळादिवशी बनला सांताक्लॉज, मुलांना दिले भन्नाट गिफ्ट्स, व्हिडिओ व्हायरल

'धुरंधर'मधील २० वर्षीय अभिनेत्री आणि सचिन तेंडुलकर यांचा नेमका संबंध काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Uruli Kanchan Crime : आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माऊंट मेरी चर्चमध्ये ख्रिसमसचा जल्लोष, प्रभू येशूच्या जन्मोत्सवासाठी वांद्र्यात गर्दी

SCROLL FOR NEXT