Pakistan cricketer Saeed Anwar esakal
क्रीडा

VIDEO : आफ्रिकेच्या 'या' क्रिकेटरनं हिंदूंना बनवलं मुस्लिम; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सईद अन्वरनं दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हाशिम आमलाबाबत खळबळजनक दावा केलाय.

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सईद अन्वरनं (Pakistan cricketer Saeed Anwar) दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हाशिम आमलाबाबत (South Africa cricketer Hashim Amla) खळबळजनक दावा केलाय.

हाशिमनं हिंदूंना (Hindu) मुस्लिम बनवल्याचा दावा त्यानं केलाय. पाकिस्तानसाठी 55 कसोटी सामन्यांमध्ये 4 हजार 52 धावा आणि 247 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 हजार 824 धावा करणाऱ्या सईद अन्वरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये अन्वर अमलाच्या खेळाचं कौतुक करताना दिसत आहे. अमलाचं कौतुक करताना त्यानं केलेल्या खुलाशांवरून खळबळ उडालीये. सईद अन्वर म्हणाला, 'विश्वचषकात अनेक लोक इस्लाम धर्म (Islam Religion) स्वीकारत आहेत. अल्लाहनं विश्वचषक हे माध्यम बनवलंय. हाशिम आमला हा महान क्रिकेटपटू आहे. त्यानं अनेकांना कलमा शिकवला आणि एक हिंदू कुटुंब पूर्ण मुस्लिम (Muslim) झालं.'

मात्र, या वक्तव्यानंतर सईद अन्वर खूप ट्रोल होत आहे. हाशिम आमलाबद्दल बोलायचं झालं तर त्याची मूळं भारताशी जोडलेली आहेत. 1927 मध्ये त्याचे आजोबा सुरतहून दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले होते. अमलानं 2004 ते 2019 दरम्यान 124 कसोटी, 181 एकदिवसीय आणि 44 टी-20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या नावावर 9 हजार 282 कसोटी धावा, 8113 एकदिवसीय धावा आणि 1277 टी-20 धावा आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2 हजार, 3 हजार, 4 हजार, 5 हजार, 6 हजार आणि 7 हजार धावा करण्याचा विक्रम अमलाच्या नावावर आहे. 10 एकदिवसीय शतकं झळकावणारा तो सर्वात वेगवान क्रिकेटपटू देखील आहे. जून 2014 ते जानेवारी 2016 दरम्यान त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचं नेतृत्वही केलं.

आयपीएलमध्ये 2 शतकं

हाशिम आमला आयपीएलमध्येही खेळला आहे. 2017 मध्ये त्यानं किंग्स इलेव्हन पंजाब, आता पंजाब किंग्ससाठी 2 शतकं झळकावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवल्यानंतर, 8 ऑगस्ट 2019 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT