Pakistan Former Pacer Umar Gul Appoint as Afghanistan bowling coach  esakal
क्रीडा

पाकचा उमर गुल झाला अफगाणिस्तानचा बॉलिंग कोच

अनिरुद्ध संकपाळ

पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज उमर गुल (Umar Gul) याची अफगाणिस्तान (Afghanistan) क्रिकेट संघाचा बॉलिंग कोच (Bowling Coach) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तो अफगाणिस्तानच्या झिम्बावे दौऱ्यापासून संघाशी जोडला जाईल. या दौऱ्यावर अफगाणिस्तान तीन वनडे आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत वक्तव्यात सांगितले की, 'अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नुकतीच उमर गुलची बॉलिंग सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. एप्रिल महिन्यापासून संघ युएईमध्ये सराव करत आहे. तेव्हा उमर गुल संघातील वेगवान गोलंदाजांबरोबर काम करत होता. त्याची उपयुक्तता पाहून आणि संघाची गरज पाहून त्याला आम्ही अफगाणिस्तान संघाचे बॉलिंग कोच होण्याचा प्रस्ताव दिला होता.'

गुल प्रमाणेच पाकिस्तानचा माजी कर्णधार युनिस खान याला देखील अफगाणिस्तान संघाचे बॅटिंग कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गुलला पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेट्टा ग्लॅडिएटर्सचा बॉलिंग कोच म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. अफगाणिस्तानने नुकतेच ग्रॅहम थोर्पेंची संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी लान्स क्लुजनर यांची जागा घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT