AUS vs PAK  esakal
क्रीडा

AUS vs PAK : एका चेंडूवर तब्बल 7 धावा करून ठोकलं अर्धशतक; सुस्त पाकिस्तानी संघाचा Video होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

AUS vs PAK : नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. सध्या पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियन पीएम 11 संघाविरूद्ध सराव सामना खेळत आहे. या सामन्यात पहिल्याच दिवशी दमदार फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानी संघाने दुसऱ्या दिवशी मात्र ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅट नेरवशॉने भन्नाट पद्धतीने आपले अर्धशतक पूर्ण केलं. त्याने एका चेंडूत तब्बल 7 धावा करत ही अर्धशतकी मजल मारली. मॅटला यावेळी पाकिस्तानी क्षेत्ररक्षणकांनी चांगलाच हातभार लावला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मॅटने पाकिस्तानचा गोलंदाज अब्रार अहमद टाकत असलेल्या 78 व्या षटकात चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवला. मीर हमझाने हा चेंडू अगदी सीमारेषेजवळ आडवला. मात्र तोपर्यंत मॅटने तीन धावा पूर्ण केल्या होत्या. हमझाने चेंडू नॉन स्ट्रायकर एन्डला थ्रो केला. तेथे बाबर आझमने चेंडू पकडला आणि स्ट्रायकर एन्डकडे जोरदार थ्रो केला.

मात्र हा थ्रो मिस झाला अन् थेट सीमारेषेपार गेला. यामुळे मॅटच्या खात्यात अजून चार धावा जमा झाल्या. अब्रारच्या एका चेंडूवर 7 धावा झाल्या. त्याला मॅटसह बाबर आझमचा देखील हातभार लागला. (Cricket News)

मॅट हा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा वारसदार म्हणून आपली दावेदारी सांगत आहे. पाकिस्तानविरूद्धची मालिका ही डेव्हिड वॉर्नरची शेवटची कसोटी मालिका असणार आहे. वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी गेल्या काही दिवसांपासून सुमार होत आहे. त्याच्या संघातील स्थानावरूनही वादंग निर्माण झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जान्सनने वॉर्नरला इतका आदर देत समारोपाची कसोटी मालिका खेळवण्यावरून टीका केली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT