Hasan Ali esakal
क्रीडा

''ट्विटरवर जरा चांगलं लिहीत जा'' हसन अली पत्रकारावर भडकला Video

पाकिस्तानचा हसन अली पत्रकारावर भडकला

अनिरुद्ध संकपाळ

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali) आणि वाद हे समीकरणच बनले आहे. टी २० वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) महत्वाच्या क्षणी झेल सोडणे आणि महागडे षटक टाकण्याने तो टीकेचा धनी ठरला होता. आता पुन्हा एकदा हसन अली चर्चेत आला आहे. पाकिस्तान सुपर लीगदरम्यान (Pakistan Super League) झालेल्या पत्रकार परिषदेवेळी हसन अली पत्रकारावर (Journalist) चांगलाच भडकला. या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हारल होत आहे.

पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) एका पत्रकार परिषदेवेळी इस्लामाबाद युनायटेड चा गोलंदाज हसन अली (Hasan Ali) एका पत्रकाराच्या सगळ्या प्रश्नांना बगल देत होता. ज्या ज्या वेळी तो पत्रकार प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो होता त्या त्या वेळी हसन अली पुढचा प्रश्न असे म्हणत त्या पत्रकाराचे बोलणे तोडत होता. सातत्याने असे होत असल्याने पत्रकार वैतागला आणि तो हसन अलीला हे वागणे बरे नव्हे असे म्हणाला.

त्यावर हसन अलीने 'पहिल्यांदा तुम्ही ट्विटरवर चांगले लिहायाला शिाका. त्यानंतर मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. तुम्ही कोणावरही वैयक्तीक टीका करु शकत नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) म्हणून तुम्हाला रोखता येत नाही पण आम्हालाही काहीतरी अधिकार आहेत.' असे प्रत्युत्तर दिले. हसन अलीने भडकलेला पाहून इस्लामाबाद युनायटेडच्या अधिकाऱ्याने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.

ज्या पत्रकाराने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता त्याने नाव आहे अनास सईद (Anas Saeed). त्याने ट्विटरवर कोरोना प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप केला होता. त्यावेळी सईद यांनी हसन अलीचा एक व्हिडिओ पोस्ट करत 'कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार प्रवास करताना मास्क घालणे गरजेचे आहे. ज्यांनी ज्यांनी आपला मास्क काढला आहे त्यांना दंड केला पाहिजे.'

यावर हसन अलीने 'उगाच दंगा करुन नका हा जुना व्हिडिओ आहे. तुम्हा पहिल्यांदा तथ्य तपासून पहा. उगाचच फेक मसाला देण्याची गरज नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा नाही.' असे प्रत्युत्तर दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: सांगरूळ बंधाऱ्यामध्ये कुंभी नदीपात्रात कोंबड्यांचे वेस्टेज

SCROLL FOR NEXT