Speculation intensifies as Pakistan’s participation in the ICC T20 World Cup comes under question following Bangladesh’s reported withdrawal.

 

esakal

क्रीडा

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

Uncertainty over Pakistan T20 World Cup participation : जाणून घ्या, जर पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर पडला तर कोणत्या नवीन संघाला मिळू शकते संधी?

Mayur Ratnaparkhe

Pakistan’s Participation in T20 World Cup Under Doubt : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होण्यापूर्वीच प्रचंड गोंधळ उडाल्याचे सध्या दिसत आहे. आधीच या स्पर्धेतून बांगलादेशचा पत्ता कट झालेला असताना, आता भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारा पाकिस्तान देखील या स्पर्धेत खेळणार की नाही, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण, याबाबतचा निर्णय पाकिस्तान सरकार घेईल, असं म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवीन खेळी खेळली आहे.

ग्रुप सी मधील बांगलादेशच्या संघाने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार दिला होता. शिवाय, आयसीसीकडे स्थळ बदलण्याची विनंतीही केली होती. मात्र त्यांची ही विनंती आयसीसीने फेटाळून लावली. अखेर आयसीसीच्या अल्टिमेटमनंतर बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. आता बांगलादेशच्या जागी या स्पर्धेत स्कॉटलंडचा संघ खेळणार आहे.

तर, बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट संघानेही टी-२० विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची भाषा केल्याचे समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बांगलादेशच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. टी-२० विश्वचषकातून बांगलादेश बाहेर पडल्यानंतर, पीसीबीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी पंतप्रधानांच्या येण्याची वाट पाहत असल्याचे सांगितले आहे. एवढच नाहीतर जर आमचे सरकार म्हणत असेल की पाकिस्तान सहभागी होणार नाही, तर आम्ही देखील स्पर्धेतून बाहेर पडू असं त्यांनी म्हटलं आहे.

याच पार्श्वभूमीवर आता असाही प्रश्न समोर येत आहे की, जर बांगलादेश पाठोपाठ पाकिस्तानचा संघही या स्पर्धेत सहभागी झाला नाही, तर मग त्यांच्या जागी कोणत्या संघाला खेळण्याची संधी मिळू शकेल? आयसीसी विश्वचषक टी-२० २०२६ मध्ये एकूण २० संघ सहभागी होत आहेत. आयसीसीच्या पूर्ण सदस्य संघांव्यतिरिक्त, रिजनल क्वालिफायरमध्ये अव्वल स्थान मिळवणारे संघ देखील सहभागी होत आहेत.

अशावेळी जर पाकिस्तान टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्याची परिस्थिती उद्भवली, तर आयसीसीकडे अनेक पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. हे पर्याय रिजनल क्वालिफायरमध्ये दमदार कामगिरी करणारे संघ आहेत. ज्यामध्ये पापुआ न्यू गिनी, केनिया, टांझानिया, बर्म्युडा आणि जर्सी यांचा समावेश आहे. कारण, हे संघ रिजनल क्वालिफायर फेरीत जवळ येऊन बाहेर पडले होते.

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

Mohol News : अठरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेऊन संपविले जीवन

Latest Marathi news Live Update: जिल्हापरिषद निवडणुकीत महायुतीचे ११ जण बिनविरोध

SCROLL FOR NEXT