Pakistan vs Netherlands sakal
क्रीडा

Pak vs Ned : ताकही फुंकून पिण्याची पाकिस्तानवर वेळ, दुबळ्या संघाविरुद्ध शेवटची संधी

पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर होणार का?

सकाळ ऑनलाईन टीम

Pakistan vs Netherlands T-20 World Cup : सलग दोन पराभवांचे धक्के सहन करावे लागलेल्या पाकिस्तानचा आज नेदरलंडविरुद्ध सामना होत आहे. या लढतीतून ते पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असतील; परंतु झिम्बाब्वेकडून झालेल्या पराभवामुळे पाकचे खेळाडू आज ताकही फुंकून पिण्याची सावधगिरी बाळगतील.

नेदरलँडचा संघ पाकपेक्षा किती तरी पटीने अनुभवात कमी आहे. एरवी या लढतीसाठी पाकने संघातील राखीव खेळाडूंना संधी दिली असती; पण आता ते कोणताही धोका पत्करणार नाही. ही लढत जिंकून विजयाचे पहिले गुण पाठीशी लावण्याबरोबर सरासरीही उंचावण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतील.

पाकला सर्वच क्षेत्रात सुधारणा करावी लागणार आहे आणि त्याची सुरुवात कर्णधार बाबर आझमपासून होणार आहे. बाबरचे अपयश भारत आणि झिम्बाब्वेकडून झालेल्या पराभवानंतर उठून दिसले. झिम्बाब्वेविरुद्ध माफक आव्हानही त्यांना गाठता आले नव्हते. त्यांचे सर्व माजी खेळाडू संघावर टीकांचे आसूड ओढत आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात पाकचे खेळाडू जोरदार खेळ करण्याची शक्यता आहे.

पाककडे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे; पण एकालाही ठसा उमटवता आलेला नाही. शहिन शहा आफ्रिदीच्या तंदुरुस्तीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. आजच्या सामन्यात कदाचित त्याला वगळले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli District Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या विजयी उमेदवारांची यादी; गोपीचंद पडळकर, संजय काका पाटलांचा जिल्हा बँकेत प्रवेश

Nepal Helicopter Collision : नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टरची लँडिंगदरम्यान धडक; एका पर्यटकाचा मृत्यू, एक जखमी, अपघाताचा थराराक VIDEO VIRAL

IND vs NZ 1st ODI: मोठा धक्का! सराव सत्रात दोन खेळाडूंमध्ये जोरदार धडक... मैदानावरून थेट हॉस्पिटलमध्ये; पहिल्या वन डेतून माघार

Latest Marathi News Live Update : महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करुन लोकांशी अश्लील चॅटिंग करणाऱ्या तरुणाला दौंड पोलिसांकडून अटक

अहिल्यानगर जिल्हा बँकेत लंके, तनपुरेंचा विजय; माजी आमदाराला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT