babar and dhoni
babar and dhoni e sakal
क्रीडा

कोहलीला ओव्हरटेक करणाऱ्या बाबरची धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

सुशांत जाधव

Zimbabwe vs Pakistan : झिम्बाब्वे दौऱ्यातील कसोटी मालिकेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केलीय. पाकिस्तानने झिम्बाव्बे संघाला 2-0 अशी मात देत मालिका खिशात घातली. बाबर आझमने पाकिस्तानी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना सलग चार सामने जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवलाय. या कामगिरीसह त्याने कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी (ms dhoni Record) केलीये.

बाबर आझमपूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 2008 मध्ये सलग 4 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम नोंदवला होता. बाबर आझमने यंदाच्या वर्षी दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तानी संघाला 2-0 असा विजय मिळवून दिला होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाने कमालीची कामगिरी नोंदवली.

धोनीला ओव्हरटेक करण्याची संधी

बाबर आझम आणि महेंद्रसिंह धोनी यांच्याशिवाय कर्णधार अली बचेर (1970), ब्रायन क्लोज (1967), परसी चॅपमॅन (1928), वार्विक आर्मस्ट्रोंग (1921), लॉर्ड हॉक (1899), डबल्यूजी ग्रेस (1890) यांनी नेतृत्वाची धूरा सांभाळल्यानंतर सलग 4 कसोटी सामने जिंकले होते. वनडे क्रिकेटमध्ये अव्वलस्थानावर असलेल्या बाबर आझमला या रेकॉर्डमध्ये आणखी सुधारणा करण्याची नामी संधी आहे. पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिज आणि बांगलादेश विरुद्ध ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रत्येकी दोन-दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील विजयासह बाबर आझम धोनीला ओव्हरटे करु शकतो.

पाकिस्तानचा दबदबा कायम

पाकिस्तान क्रिकेट संघाने यंदाच्या वर्षी दक्षिण अफ्रिकेला घरच्या मैदानात कसोटी आणि टी-20 मालिकेत पराभूत केले होते. सहाव्यांदा पाकिस्तान संघाने 6 किंवा त्यापेक्षा अधिकवेळा मालिका जिंकली आहे. पाकिस्तानने 2011-12 मध्ये सलग 13 सीरीज, 2015-16 मध्ये 9, 2001-02 मध्ये 8, 1993-94 मध्ये 6 आणि 2017-18 मध्ये 6 सीरीज जिंकल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT