Paul Pogba house burglarized During Manchester United game  esakal
क्रीडा

घरात मुलं झोपली असतानाच त्यांनी... पोग्बाने सांगितला तो भयानक अनुभव

सकाळ डिजिटल टीम

मँचेस्टर युनायटेडचा (Manchester United) मिडफिल्डर पॉल पोग्बाने (Paul Pogba) चॅम्पियन्स लीगमधील अट्लेटिको माद्रिद विरूद्धच्या सामन्यानंतर एक ट्विटर पोस्ट केली. या पोस्टमध्ये पॉल पॉग्बाने घरफोडीच्या (burglarized) घटनेबाबत माहिती दिली. ज्यावेळी चोर त्याच्या घरात घुसले त्यावेळी त्याची मुलं बेडरूममध्ये झोपली होती. या चोरांबद्दल कोणीही माहिती देईल त्याला बक्षिस देण्यात येईल असेही पोग्बाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले.

फुटबॉलपटू पोग्बा आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहितो की, 'चोर आमच्या घरात जवळपास पाच मिनिटे होते. मात्र या काळात त्यांनी आमच्याकडून एक बहुमूल्य गोष्ट चोरी केली. त्यांनी आमच्या घरात आम्ही सुरक्षित आहोत हा समज, सुरक्षितता चोरी केली.

पोग्बाने सांगितले की, ही चोरी ज्यावेळी मँचेस्टर युनायटेड अट्लेटिको विरूद्ध 1 - 0 ने पराभूत होत होता त्यावेळी शेवटच्या मिनिटात झाली. पोग्बाची पत्नी त्यावेळी ऑल्ड ट्रॅफोर्डवर सामना पाहण्यासाठी आली होती. घरात चोरी झाल्याची माहिती मिळताच पत्नी घराकडे धावली. त्यावेळी मुलं सुरक्षित आहेत की नाही याची काहीच कल्पना नव्हती. एक बाप म्हणून मुलांची सुरक्षा करू न शकणे यापेक्षा वाईट भावना कोणतीही नाही. मी काल रात्री जे अनुभवले असा अनुभव कोणालाही येऊ नये असे मला वाटते.'

पोग्बा पुढे म्हणाला की, म्हणूनच चोरीसंदर्भात कोणी माहिती दिली तर त्याला बक्षिस देण्याची घोषणा आम्ही करत आहोत. जर कोणाला माहिती असले तर त्यांनी rewardpogba@gmail.com वर संपर्क करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT