Pakistan national cricket team  sakal
क्रीडा

PAK vs ENG: पाकिस्तान क्रिकेटमध्ये होणार भूकंप! रमीझ राजाबरोबर बाबरचे कर्णधारपद धोक्यात

Kiran Mahanavar

Ramiz Raja-Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबाबत काही दिवसांत भूकंप होणार आहे. चेअरमन रमीझ राजांची लवकरच गच्छंती होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाची अवस्था खुपच वाईट आहे.

कराची येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका 3-0 ने क्लीन स्वीप केली. यासोबतच बाबर आझमचा कर्णधार असलेल्या पाकिस्तानी संघाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही नोंदवला गेला आहे. पाकिस्तानने इतिहासात प्रथमच आपल्याच भूमीवर क्लीन स्वीप झाला आहे.

बाबरच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ज्या गोलंदाजांनी कहर केला. त्याच गोलंदाजांविरुद्ध इंग्लिश फलंदाजांनी धावा केल्या आहेत. अशा स्थितीत या मालिकेनंतर पाकिस्तानला नवा कसोटी कर्णधार मिळू शकतो, अशी चर्चा पाकिस्तानी माध्यमांमध्ये सातत्याने होत आहे. तर दुसरीकडे रमीझ राजा यांची खुर्चीही धोक्यात आल्याचे दिसत आहे. वृत्तानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नवा अध्यक्ष मिळू शकतो. रमीझ राजा यांच्या जागी नजम सेठी यांना पीसीबीचे प्रमुख बनवले जाऊ शकते.

पाकिस्तानने पहिल्या डावात 304 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात इंग्लंडने 354 धावा केल्या आणि पहिल्या डावात 50 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या 18 वर्षीय रेहान अहमदने शानदार गोलंदाजी केल्याने पाकिस्तानचा डाव 216 धावांत आटोपला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 167 धावांचे लक्ष्य ठेवले. धावांचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने पुन्हा एकदा धडाकेबाज सुरुवात केली आणि दोन्ही सलामीवीरांनी 11.3 षटकांत पहिल्या विकेटसाठी 87 धावा जोडल्या. धडाकेबाज सुरुवातीनंतर, इंग्लिश संघासाठी विजय ही केवळ औपचारिकता होती आणि चौथ्या दिवशी सकाळी त्यांनी पहिल्या तासात उर्वरित 55 धावा करून सामना आणि मालिका खिशात घातली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT