FIFA World Cup 2022 Portugal Defeat Ghana Cristiano Ronaldo esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : रोनाल्डोचा विश्वविक्रम, पोर्तुगालचा विजय मात्र घानानेही दिली कडवी झुंज

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup 2022 Portugal Defeat Ghana Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालने घानाचा 3 - 2 असा पराभव करत फिफा वर्ल्डकप 2022 ची विजयाने सुरूवात केली. पोर्तुगालकडून पेनाल्टीवर रोनाल्डोने पहिला गोल करत पाच वर्ल्डकपमध्ये गोल करण्याचा विश्वविक्रम केला. यानंतर फेलिक्स आणि लिओने पाठोपाठ गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली खरी. मात्र घानाच्या आंद्रे आयेवू आणि उस्मान बुकारीने देखील पोर्तुगालचा डिफेन्स भेदत त्यांना टेन्शन दिले. अखेर इंज्यूरी टाईममध्ये घानाला बरोबरी साधणारा तिसरा गोल करण्यात अपयश आले आणि पोर्तुगालचा यंदाच्या वर्ल्डकपमधील विजय निश्चित झाला. विशेष म्हणजे या सामन्यात पहिल्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही. मात्र दुसऱ्या हाफमध्ये 5 गोल मारण्यात आले.

First Half : सगळा खेळ घानाच्या गोलपोस्टजवळ

पोर्तुगालचा कर्णधार स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोने विक्रमी पाचव्या वर्ल्डकपची सुरूवात घानाविरूद्ध केली. पहिल्या हाफमध्ये पोर्तुगालने सातत्याने घानाच्या गोलपोस्टवर आक्रमण करण्याच्या संधी शोधल्या. पोर्तुगालने बॉल पजेशन आणि पासिंगच्या सहाय्याने खेळ नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे घाना ख्रिस्तियानो रोनाल्डोभवती बचावात्मक कडे उभारण्यातच गुंग राहिला. त्यामुळे त्यांना पोर्तुगालवर चाल करून जाण्याची फारशी संधी मिळाली नाही. उलट पोर्तुगाल घानावर कधी डाव्या बाजूने तर कधी उजव्या बाजूने आक्रमण करत राहिला. यातच रोनाल्डोला हेडरद्वारे गोल डागण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याचा हेडर गोलपोस्टच्या बाजूने गेला. दरम्यान, 31 व्या मिनिटाला फेलिक्सच्या पासवर रोनाल्डोने गोल मारत वर्ल्डकपमधील आपले खाते उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र पंचांनी लगचे शिट्टी वाजवून रोनाल्डोने फाऊल केल्याचे सांगत हा गोल रद्द केला. दरम्यान, घानाला पहिल्या हाफच्या उत्तरार्धात पोर्तुगालविरूद्ध एक कॉर्नर मिळाला होता. मात्र याचा त्यांना फायदा उचलचा आला नाही.

Second Half : रोनाल्डोने इतिहास रचला

दुसऱ्या हाफमध्ये देखील पोर्तुगालने घानाच्या गोलपोस्टवर चढाई करत त्यांच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला होता. दरम्यान, घानाने धसमुसळा खेळ केल्याने त्यांना तीन यलो कार्ड मिळाले. याच गोंधळात ख्रिस्तियानोला घानच्या सालिसोने डीमध्येच खाली पाडल्याने पोर्तुगालला पेनाल्टी मिळाली. रोनाल्डोने 64 व्या मिनिटाला पेनाल्टीवर गोल डागत इतिहास रचला. त्याने पाच वर्ल्डकपमध्ये गोल करण्याचा कारनामा करून दाखवला. यानंतर मात्र लगेचच 73 व्या मिनिटाला घानाचा कर्णधार आंद्रे आयेवूने मैदानी गोल करत पोर्तुगाशी बरोबरी साधली.

सामना बरोबरीत आल्याने पोर्तुगालचे चाहते टेन्शनमध्ये आले होते. मात्र 78 व्या मिनिटाला जोआओ फिलिक्सने फर्नांडेसच्या पासवर गोल करत पोर्तुगालला 2 - 1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुन्हा फर्नांडोच्याच पासवर राफेल लिओने 80 व्या मिनिटाला तिसरा गोल करत आघाडी 3 - 1 अशी नेली. दरम्यान फूलटाईम संपण्यास काही मिनिटेच शिल्लक असताना पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डो आणि फिलिक्स बाहेर गेले. बदली खेळाडू आत येताच घानाने पोर्तुगालवर दुसरा गोल डागत सामना जिंवत ठेवण्याचा प्रयत्न केला. घानासाठी हा गोल उस्मान बुकारीने केला.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT