Prithvi Shaw Double Hundred  esakal
क्रीडा

Prithvi Shaw : 39 चेंडूत 178 धावा! पृथ्वी शॉचा 11 षटकार अन् 28 चौकारांसह द्विशतकी धमाका

अनिरुद्ध संकपाळ

Prithvi Shaw Double Hundred : भारताचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या काऊंटी क्रिकेटमध्ये आपले नशीब आजमावत आहे. भारतीय संघातून वगळला गेलेला पृथ्वी शॉ संघात परतण्यासाठी प्रयत्न करतोय. मात्र आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे आणि सततच्या वादामुळे त्याला आपले संघातील स्थान गमवावे लागले.

भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता पृथ्वी शॉ काऊन्टीचा देखील हंगाम गाजवत आहे. नॉर्थम्पटनशायर संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने आज सोमरसेटविरूद्धच्या सामन्यात 153 चेंडूत 244 धावांची तुफानी खेळी केली. त्याने 129 चेंडूत द्विशतक ठोकत आपण अजूनही मोठा धमाका करण्याची क्षमता ठेवतो हे दाखवून दिले. (Prithvi Shaw In County Cricket)

पृथ्वी शॉने 153 चेंडूत केलेल्या 244 धावांच्या जोरावर नॉर्थम्पटनशायरने 50 षटकात 8 बाद 415 धावांचा डोंगर उभा केला. पृथ्वी शॉने आपल्या खेळीत 28 चौकार आणि 11 षटकार मारले. त्याने 39 चेंडूतच 178 धावा कुटल्या. नॉर्थम्पटनशायरकडून व्हाईटमॅनने 54 तर रिकार्डोने 47 धावांची खेळी केली. (Prithvi Shaw Double Hundred News)

पृथ्वी शॉ क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कठिण काळाबद्दल बोलला होता. तो म्हणाला की, प्रत्येकजण एकमेकांशी बोलतं. मात्र कोणी मन मोकळं करत नाही. मी तरी कोणासोबत मन मोकळं करत नाही. दंगा मस्ती सुरू असते मात्र वैयक्तिक स्पेस ही वैयक्तिकच असते.'

ज्यावेळी पृथ्वीला तो त्याचं मन कोणासमोर मोकळं करतो असे विचारल्यावर त्याने त्याच्या वडिलांच आणि कोचचं नाव घेतलं होतं. तो म्हणाला होता की, 'मी माझ्या वडिलांशी बोलत असतो. जर क्रिकेटबाबत काही असेल तरी मी माझे प्रशिक्षक प्रशांत शेट्टी यांच्याशी चर्चा करतो. मी फक्त तुम्हालाच सांगत आहे की मी आता माझे विचार लोकांशी शेअर करणं बंद केलं आहे. मी ते सर्व माझ्याजवळच ठेवतो.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT