Prithvi Shaw Bizarre Video esakal
क्रीडा

Prithvi Shaw Video : पृथ्वी शॉ कारकीर्द सावरण्यासाठी काऊन्टी खेळायला गेला अन् भलतीच 'सुरूवात' करून बसला

अनिरुद्ध संकपाळ

Prithvi Shaw Bizarre Video : भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी जीवाचं रान करतोय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या पृथ्वी शॉला आयपीएलमध्ये फारशी चमक दाखवता आली नाही. त्याला पुनरागमनाची संधी मिळाली मात्र मैदानाबाहेरील वादात अडकलेल्या पृथ्वीला याचा फायदा उचलता आला नाही.

आता आपली कारकीर्द सावरण्यासाठी पृथ्वी शॉने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र पृथ्वी शॉचा नॉर्थम्पटनशायरकडून पदार्पणाचा प्रयत्न चांगलाच फसला. तो अत्यंत विचित्र पद्धतीने बाद झाला.

पृथ्वी शॉ इंग्लंड डोमॅस्टिक वनडे कप 2023 सुरू आहे. या स्पर्धेत ग्लुकेस्टरशायर विरूद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात पृथ्वी शॉने सलामी दिली. मात्र त्याची ही खेळी 16 व्या षटकातच विचितत्रपणे संपुष्टात आली.

पृथ्वी शॉ 34 धावांवर खेळत असातना पॉल वेन मीकेरेनचा एक बाऊन्सर खेळण्याच्या नादात तो थेट विकेटवरच पडला. पृथ्वी शॉ पहिल्याच सामन्यात हिट विकेट झाला. पृथ्वी शॉने आपल्या 34 धावांच्या छोटेखानी खेळीत 2 चौकार आणि एक षटकार मारला होता.

पृथ्वी शॉने क्रिकेबझशी बोलताना सांगितले की, 'मला नाही वाटत की माझ्या खेळात बदल करण्याची ही योग्य वेळ आहे. माझ्या खेळात जे काही बदल करायचं होते ते आधीच करून झाले आहे. ज्यावेळी मी क्रिजवर जातो आणि माझी नजर सेट होते त्यावेळी मला माझा नैसर्गिक खेळ करणे गरजेचे असते.'

काऊंटी संघाच्या अंतर्गत सामन्यात पृथ्वी शॉने 39 चेंडूत 65 धावांची खेळी केली होती. दिल्ली कॅपिटल्स कडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉचा आयपीएल 2023 चा हंगाम फारसा चांगला गेला नाही.

त्याला हंगामात मधेच संघातून वगळण्यात आले होते. आता तो काऊंटी क्रिकेटमध्ये आपला फॉर्म सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.

काऊंटी क्रिकेट खेळण्यापूर्वी पृथ्वी शॉ माध्यमांना म्हणाला होता की, 'ही माझ्यासाठी एक चांगली संधी आहे. मी त्यासाठी नॉर्थम्पटनशायरचा आभारी आहे.' पृथ्वी शॉ गेल्या बऱ्याच काळापासून भारतीय संघापूसन दूर आहे. विजामुळे पृथ्वी शॉ इंग्लंडमध्ये उशिरा दाखल झाला. तो दोन चार दिवसीय काऊन्टी चॅम्पियनशिपच्या सामन्यांना मुकला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Municipal Election : बंडखोरी करणारे भाजपचे ३२ जण निलंबित; अग्रवाल, भगवान मेंढे, दीपक चौधरीचा समावेश

Nagpur Crime : प्रेमसंबंधातून बहीण-भावावर हल्ला; दोघेही गंभीर जखमी, आरोपी अटक

दुर्दैवी घटना! गोरेगावमधील भगतसिंग नगरमध्ये भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

Budget 2026 : करदात्यांसाठी खुशखबर! येणाऱ्या बजेटमध्ये ‘या’ ५ गोष्टींमध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; तुम्हाला नेमका काय फायदा?

World GK : भविष्य सांगणारा आरसा ते मेलेल्या लोकांशी बोलण्यापर्यंत..! 'या' 7 गॅझेट्सनी जगाला हादरवलंय

SCROLL FOR NEXT