prithvi shaw sakal
क्रीडा

Prithvi Shaw : संघात स्थान न मिळाल्याने पृथ्वीने सोडले मौन, या गोष्टीमुळे...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे टीमची नुकतीचं घोषणा करण्यात आली.

Kiran Mahanavar

Prithvi Shaw Ind vs SA : दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवनला कर्णधार तर श्रेयस अय्यरला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी पृथ्वी शॉ हा मोठा दावेदार होता, मात्र निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे. आता त्याच्या वेदना सोशल मीडियावर पसरल्या आहेत. संघात स्थान न मिळाल्याने पृथ्वीने आपले मौन सोडले आहे.

भारताचा स्टार फलंदाज दीर्घकाळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली आहेत. मात्र निवड समितीने पृथ्वी शॉला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग बनवलेले नाही. तर सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि शुभमन या सलामीवीरांना संघात संधी मिळाली आहे. टीम इंडियामध्ये स्थान न मिळाल्यावर पृथ्वी शॉने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, शब्दांवर विश्वास ठेवू नका, त्याच्या कामावर विश्वास ठेवू नका, कृती हे सिद्ध करत आहे की शब्द निरर्थक का आहेत. पृथ्वी शॉने येथे कोणाचेही नाव घेतले नसले तरी तो निराश झाल्याचे मानले जात आहे.

पृथ्वी शॉ जेव्हा तो आपल्या लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणाला फाटा देऊ शकतो. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. पृथ्वी शॉ भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने भारतीय संघासाठी 5 कसोटी सामन्यात 339 धावा, 6 एकदिवसीय सामन्यात 189 धावा आणि 1 टी-20 सामना खेळला आहे. खराब फॉर्ममुळे तो टीम इंडियाच्या बाहेर गेला होता, पण 2022 मध्ये त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ दाखवला. मात्र यावेळी निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Protest March : गोकुळमधील सत्तासंघर्ष पेटला; ९ नोव्हेंबरला सतेज पाटलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांनी षडयंत्र केल्याचा आरोप

Google Layoffs 2026: AI वर वाढता खर्च; ५ देशांतील कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याची ऑफर, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सत्ता मिळत नाही म्हणून कायदा बदलता का? गोकुळच्या सत्तासंघर्षावरून सतेज पाटील आक्रमक, कोरमचा मुद्दा उपस्थित करण्यावरून सरकारला सवाल

Ethanol Car: १००% इथेनॉलवर धावणारी Toyota Innova Hycross लवकरच होणार लाँच; नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती!

New Recharge Plan: फक्त ३५ रुपयांत दोन OTT प्लॅटफॉर्म! नवा रिचार्ज पाहून ग्राहकही थक्क, दिवाळीसाठी खास सुविधा काय?

SCROLL FOR NEXT