Pro Kabaddi esakal
क्रीडा

Pro kabaddi : प्रो कबड्डीचा आजपासून थरार

कोरोनानंतर प्रथमच प्रेक्षकांच्या उपस्थितीत होणार स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : कोरोनानंतर पूर्वपदावर येणाऱ्या प्रो कबड्डीचा नववा हंगाम आजपासून सुरू होत आहे. गतवर्षी प्रेक्षकांविना स्पर्धा झाली होती. यंदा तीन ठिकाणीच सामने होणार असले, तरी प्रेक्षकांचेही पुनरागमन होणार आहे.

कंतीरवा बंदिस्त स्टेडियममध्ये गतविजेते दबंग दिल्ली आणि माजी विजेते यु मुम्बा यांच्यातील सामन्याने यंदाच्या प्रो कबड्डीचा श्रीगणेशा होणार आहे. पहिले तीन दिवस तीन-तीन सामने होणार आहेत. दिल्ली विरुद्ध मुंबई यांच्यानंतर बंगळूरू-तेलुगू आणि जयपूर-युपी योद्धा अशी मेजवानी आहे. स्पर्धेचा सुरुवातीचा टप्पा बंगळूरमध्ये पार पडल्यानंतर पुणे आणि हैदराबाद येथे सामने होणार आहेत. सामन्यांना सायंकाळी ७.३० पासून सुरुवात होणार आहे.

दबंग दिल्ली संघाचा कर्णधार नवीन कुमार म्हणाला की, आम्ही गतविजेते असल्यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे यंदाच्या मौसमातही चांगली कामगिरी करून त्याची पुनरावृत्ती करू. गेल्या वर्षी मी एक खेळाडू होतो; तर यंदा माझ्याकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. जबाबदारी बरोबरच आपली कामगिरी उंचावण्याचा माझा निर्धार आहे.

मशाल स्पोर्ट्स लीगचे मुख्य आणि विवो प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी म्हणाले की, प्रेक्षक आणि कबड्डीप्रेमी हा या स्पर्धेचा आत्मा आहे. तिन्ही ठिकाणच्या स्टेडियममध्ये चाहत्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आमचे प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : अमित शहांसोबतच्या बैठकीबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले, ''ही भेट..''

राज्यात पुढील ४-५ दिवसात तुरळक आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस; २१ जुलैनंतर तीव्रता वाढणार

Latest Marathi News Update : लालपरीचा प्रवास महागणार? १३.५०% भाडेवाढीचा प्रस्ताव

मुंबई इंडियन्स विश्वविजेते होणार; जगभरातील ट्वेंटी-२० लीगचा वर्ल्ड कप? ICC चा मास्टर प्लॅन;'World Club T20' नेमकं काय प्रकरण

Sonam Wangchuk Hunger Strike : 'सोनम वांगचुक फक्त दोन दिवस जगतील', दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र, दिल्ली सरकारवर ताशेरे ओढत बजावली नोटीस

SCROLL FOR NEXT