Rahul Dravid Statement About Injured Ravindra Jadeja  esakal
क्रीडा

Ravindra Jadeja : जडेजा टी 20 वर्ल्डकपला मुकणार? राहुल द्रविड स्पष्टच बोलला...

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja T20 World Cup : भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी टी 20 वर्ल्डकपला मुकणार आहे असे वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले. जडेजा आशिया कपमधून दुखापतीमुळेच बाहेर गेला असून त्याच्या जागी अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र या सर्व प्रकरणावर आता संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने स्पष्टीकरण दिले आहे. (Rahul Dravid Statement About Injured Ravindra Jadeja)

राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत सांगितले की, 'रविंद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आशिया कपच्या उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. तो सध्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. तो डॉक्टरांना भेटत आहे. तो काही तज्ज्ञ डॉक्टरांनाही भेटणार आहे.'

जडेजा टी 20 वर्ल्डकपला देखील मुकणार आहे का याबाबत बोलताना द्रविड म्हणाला, 'वर्ल्डकप अजून खूप लांब आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही निर्णयाप्रत येऊ नका आणि त्याला वर्ल्डकपमधून बाहेर काढू नका. आपण तो दुखापतीतून कसा सावरतोय यावर नजर ठेवून आहोत.' द्रविड पुढे म्हणाला की, 'लोक दुखापतग्रस्त होत असतात हा खेळाचाच एक भाग आहे. दुखापती होण्यापासून रोखणे हा आमच्या कामाचाच भाग आहे. जडेजाच्या बाबतीत सर्व गोष्टी त्याची दुखापत किती गंभीर आहे आणि तो त्यातून कसा सावरतो यावर अवलंबून आहेत.

द्रविड रविंद्र जडेजा वर्ल्डकपमधून बाहेर जाईल असे मानण्यास तायर नाही. तो म्हणतो की, 'मी जडेजा वर्ल्डकपमधून बाहेर झाला असं मानत नाही. जोपर्यंत जडेजाच्या दुखापतीचे चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत मी यावर जास्त काही बोलू इच्छित नाही. टी 20 वर्ल्डकपला अजून 6 ते 7 आठवडे अवकाश आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT