Rahul Tripathi Sanju Samson Ignore By Selection Committee
Rahul Tripathi Sanju Samson Ignore By Selection Committee  ESAKAL
क्रीडा

Rahul Tripathi : 'हे तर भारताचे नुकसान', संघ निवडीनंतर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

अनिरुद्ध संकपाळ

बीसीसीआयने (BCCI) येत्या 9 जून पासून दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या (South Africa) टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा नुकतीच केली. यावेळी बीसीसीआयने इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठीच्या संघाची देखील घोषणा केली. मात्र संघाची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर सनराईजर्स हैदराबादचा अव्वल फलंदाज राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) ट्रेंड होऊ लागला. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या राहुल त्रिपाठीने गेल्या काही वर्षापासून सातत्याने कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये देखील सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. तरीदेखील निवडसमितीने राहुल त्रिपाठीचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी विचार केला नाही.

बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली. निवडलेल्या या टी 20 संघावर आयपीएलच्या 15 व्या हंगामात दमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंची मोहर दिसते. संघात उमरान मलिक, अर्शदीप सिंग, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, आवेश खान या सारख्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. मात्र निवडसमितीने राजस्तान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आणि सनराईजर्स हैदराबादचा राहुल त्रिपाठी यांच्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे सोशल मीडियावर याची प्रतिक्रिया उमटली. एका नेटकऱ्याने तर राहुल त्रिपाठीला संघात स्थान न देण्याने भारताचेच नुकसान झाल्याचे मत व्यक्त केले.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद केएल राहुलकडे आले आहे. रोहित आणि विराट बरोबरच जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी यांना देखील विश्रांती देण्यात आली आहे.

या संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार असून यात ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT