Wrestler Protest Rakesh Tikait  esakal
क्रीडा

Wrestler Protest Rakesh Tikait : आता कुस्तीपटूंचा एल्गार कुरूक्षेत्रमधून; खाप प्रतिनिधी थेट राष्ट्रपतींनाच भेटणार

अनिरुद्ध संकपाळ

Wrestler Protest Rakesh Tikait : भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत यांनी महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा यासाठी आता राष्ट्रपतींनाच साकडं घालण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील अलिगड येथे शेतकऱ्यांची महापंचायत भरवण्यात आली होती. त्यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा राष्ट्रपतींकडे नेणार असल्याचे सांगितले.

राकेश टिकैत म्हणाले की, 'आम्ही शांततेने आमचे म्हणणे मांडत आहोत. या ठिकाणीही अनेक निर्णय झाले आहेत. ते निर्णय राखून ठेवण्यात आले आहेत. मात्र आम्ही राष्ट्रपतींना भेटणार आहोत. शेतकऱ्यांच्या पंचायतीने ठरवले आहे की खाप प्रतिनिधी राष्ट्रपतींची भेट घेतली. मात्र या बाबतचे अजून जे निर्णय होतील ते कुरूक्षेत्रमधून होतील. मात्र या लढाईत खाप पंचायत आणि महिलाकुस्तीपटू हरणार नाहीत. ही लढाई लढली जाईल. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही.'

लैंगिक शोषणाचा आरोप करत बृजभूषण सिंह यांच्याविरूद्ध आंदोलन करणाऱ्या भारतीय महिला कुस्तीपटूंविरूद्ध दिल्ली पोलीसांनी बळाचा वापर केल्यानंतर या प्रकरणाची दखल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने देखील घेतली. त्यांनी वक्तव्य प्रसिद्ध करत दिल्ली पोलिसांनी पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीबद्दल कडक शब्दात फटकारले.

IOC ने आपल्या वक्तव्यात म्हटले की, 'भारतीय कुस्तीपटूंना मिळालेली वागणूक ही अत्यंत वाईट आणि हादरवणारी होती. कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची स्थानिक कायद्याच्या चौकटीत बसणारी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी IOC मागणी केली.'

याचबरोबर आयओसीने भारतीय कुस्ती महासंघाला 45 दिवसात निवडणूक घेतली नाही तर बंदी घालण्याची धमकी देखील दिली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT