Ramiz Raja could removed as PCB Chairmen esakal
क्रीडा

Ramiz Raja : वाचाळवीर रमीझ राजांची PCB चेअरमनपदावरून होणार गच्छंती?

अनिरुद्ध संकपाळ

Ramiz Raja could removed as PCB Chairmen : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे वाचाळवीर चेअरमन रमीझ राजांची लवकरच गच्छंती होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने मायदेशात इंग्लंडविरूद्धच्या पाठोपाठ दोन कसोटी गमावल्यामुळे रमीझ रांजांच्या चेअरमन पदावर टांगती तलवार लटकत आहे. पीसीबीतील एका लॉबीने रमीझ राजा यांना हटवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या लॉबीने पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असून कायदा मंत्रालयाने पंतप्रधानांना याबाबत ब्रिफिंग केले आहे. क्रिकेट बोर्डाचे पालकत्व पंतप्रधानांकडे असते.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की, 'नक्कीच पडद्यामागे काही घडामोडी घडत आहेत. निजाम सेठी हे नुकतेच पंतप्रधानांना लाहोरमधील एका कार्यक्रमात भेटले होते. त्यामुळे त्यांची रमीझ राजांच्या जागी चेअरमन म्हणून नियुक्ती होऊ शकते अशी चर्चा आहे.'

तब्बल 17 वर्षांनी पाकिस्तानचा दौरा करणाऱ्या इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून आधीच मालिका खिशात घातली आहे. सध्या कराची येथे तिसरी कसोटी खेळली जात आहे. रमीझ राजा यांनी सप्टेंबर 2021 मध्ये पीसीबीच्या चेअरमन पदाची सूत्रे हातात घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांची नियुक्ती केली होती. आता पाकिस्तानमधील सरकार बदलले असून पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ आहेत.

ज्यावेळी इम्रान खान यांच्या पक्षाला 2018 च्या निवडणुकीत बहूमत मिळाले होते. त्यानंतर निजाम सेठी यांनी पीसीबीच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी मतभेद झाले होते. यानंतर रमीझ राजा यांची नियुक्ती करण्यात आली.

मात्र पाकिस्तानात एप्रिलमध्ये सत्तांतर झाल्यानंतर शाहबाज शरीफ पंतप्रधान झाले. यावेळी रमीझ राजा यांना हटवण्यासाठी जोरदार मोहीम देखील चालवण्यात आली. मात्र शाहबाज शरीफ यांनी राजांना पदावर कायम ठेवले. आता ही लॉबी पुन्हा एक्टिव्ह झाली आहे.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT