ranji-trophy-2022-23-kedar-jadhav scores 283 runs comeback after three years maharashtra-vs-assam-live-score-cricket-news kgm00  
क्रीडा

Ranji Trophy: केदार जाधवचे त्रिशतक १७ धावांनी हुकले! ३३ चेंडूत ठोकल्या १५६ धावा

धोनीच्या लाडक्या केदार जाधवने तीन वर्षांनंतर जोरदार पुनरागमन करत केला तांडव...

सकाळ ऑनलाईन टीम

Ranji Trophy Kedar Jadhav : ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांची भारतीय संघात निवड झालेली असल्यामुळे महाराष्ट्राच्या रणजी संघात तीन वर्षांनी खेळण्याची संधी मिळालेल्या केदार जाधवने जवळपास त्रिशतक झळकावलेच होते; परंतु त्याच्या आक्रमक खेळीला २८३ धावांवर ब्रेक लागला. या खेळीत २१ चौकार आणि १२ षटकार मारले, आणि ३३ चेंडूत १५६ धावा ठोकल्या. आसामविरुद्धच्या या रणजी सामन्यात महाराष्ट्राने ५९४ धावांचा डोंगर उभा केला.

महाराष्ट्राने पहिल्या डावात त्रिशतकी आघाडी घेतली असून आता त्यांनी निर्णायक विजयासाठी प्रयत्न सुरू केले परंतु आसामने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद ६५ अशी सुरुवात केली. अजून ते २५५ धावांनी पाठीमागे आहेत आणि आज अखेरचा दिवस आहे.

महाराष्ट्राची २ बाद ९५ अशी स्थिती असताना केदार फलंदाजीस आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा केदार १४४ धावांवर नाबाद होता. आज तिसऱ्या दिवशी १८७ चेंडूंत १८३ धावांची खेळी केल्यानंतर तो काही काळासाठी जखमी निवृत्त झाला.

महाराष्ट्राचा चौथा फलंदाज बाद झाल्यावर केदार पुन्हा फलंदाजीस आला आणि त्याने चेंडूमागे एक धाव या गतीने २८३ धावांपर्यंत मजल मारली. या खेळीत त्याने २१ चौकार आणि १२ षटकारांची आतषबाजी केली. त्रिशतक १७ धावांनी दूर असताना तो रियान परागच्या चेंडूवर बाद झाला.

२०१८ नंतर केदारचे हे प्रथम श्रेणीतील पहिले शतक आहे. २०१३-१४ मध्ये रणजी क्रिकेट मोसम गाजवल्यानंतर त्याचे हे पहिले द्विशतक ठरले आहे. २०१२-१३ च्या मोसमात केदारने उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात ३२७ धावांची खेळी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: ठाणे-नवी मुंबईत उभं राहणार नवं ‘बीकेसी’! १,३०० एकरवर भव्य व्यावसायिक केंद्राची घोषणा, पण कुठे उभारणार?

Pune : बिबट्या हल्ला करतो, नरडीचा घोट घेतो; शेतकऱ्यांवर गळ्यात लोखंडी खिळ्यांचे पट्टे घालण्याची वेळ

Palghar News: पालघरचा चेहरा-मोहरा बदलणार! ३०० एकरवर वन उद्यान उभारणार; पालकमंत्र्यांनी प्लॅनच सांगितला

Crime: आरजेडीला मत का नाही दिले? आधी वाद घातला, नंतर वृद्धाला क्रूरपणे संपवलं, घटनेनं खळबळ

Jalgaon News : जळगाव महापालिकेत 'भाजप विरुद्ध सर्व'! भाजप वगळता सर्वांशी युती, महाविकास आघाडीचा निवडणुकीसाठी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT