Ranji Trophy Mumbai vs Chhattisgarh sakal
क्रीडा

Ranji Trophy : छत्तीसगडच्या घातक गोलंदाजीसमोर कर्णधार रहाणेच्या मुंबई संघाची घसरगुंडी! ६१ धावांत गमावले ९ फलंदाज

रणजी क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत केलेली दिमाखदार कामगिरी आणि छत्तीसगढविरुद्धच्या सामन्यात काल पहिल्या दिवशी मिळवलेले वर्चस्व यामुळे शिथिलता आलेला मुंबई संघ अचानक अडचणीत आला.

Kiran Mahanavar

Ranji Trophy Mumbai vs Chhattisgarh : रणजी क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत केलेली दिमाखदार कामगिरी आणि छत्तीसगढविरुद्धच्या सामन्यात काल पहिल्या दिवशी मिळवलेले वर्चस्व यामुळे शिथिलता आलेला मुंबई संघ अचानक अडचणीत आला. आता पहिल्या डावात आघाडीचे तीन गुण गमावण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांच्या शानदार शतकामुळे मुंबईने १ बाद २८९ अशी भक्कम सुरुवात केली होती, पण आज पूर्ण संघ ३५१ धावांत गारद झाला. ६१ धावांत ९ फलंदाज गमावले. आज तर ६ फलंदाज ४१ धावांत बाद झाले. त्यानंतर छत्तीसगढने दिवसअखेर ४ बाद १८० अशी सुरुवात केली. पहिल्या डावात आघाडीसाठी त्यांना अजून १७१ धावांची गरज आहे.

मुंबईच्या फलंदाजीची घसरगुंडी काल कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाला तेथून सुरुवात केली. तरीही काल खेळ थांबला तेव्हा ४ बाद ३१० अशा स्थितीत मुंबईचा संघ होता. ही धावसंख्या किमान पाचशेपर्यंत नेली जाईल अशी फलंजाजी मुंबईकडे आहे; परंतु छत्तीसगढच्या आशीष चौहान आणि रवी किरण यांच्या गोलंदाजीपुढे सर्वांनी नांगी टाकली.

शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे हे वेगवान गोलंदाज संघात परतल्यामुळे मुंबईची गोलंदाजी भक्कम वाटत होती; परंतु छत्तीसगढच्या फलंदाजांनी त्यांना निष्प्रभ केले. देशपांडेला एक फलंदाज बाद करता आला. शार्दुलला तर १२ षटके गोलंदाजी केल्यावर एकही विकेट मिळाली नाही. सामन्याचे अजून दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मोलाचे ठरणार आहेत.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई, पहिला डाव ः ३५१ (पृथ्वी शॉ १५९, भूपेन लालवानी १०२, सूर्यांश शेडगे २९, रवी किरण ५३-३, आशीष चौहान १०५-६). छत्तीसगढ, पहिला डाव ः ४ बाद १८० (शशांक चांदरकर ५६, संजीत देसाई ४१, अमनदीप खेळ खेळत आहे ३५, तुषार देशपांडे ६८-१, रॉस्टन डायस १९-१, तनुष कोटियन १९-१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार का? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स; India A कडून खेळण्याचा अद्याप निर्णय नाही

Latest Marathi News Updates: गणेश विसर्जनात कृत्रिम तलावांसाठी बीएमसीकडून लाखो लिटर पाण्याचा वापर

Shoumika Mahadik : मागची ४ वर्षे गोकुळच्या वार्षिक सभेला शौमिका महाडिकांची खुर्ची कोपऱ्यात, यंदा मात्र थेट मध्यभागी; सभा वादळी...

Shivaji Maharaj : कोल्हापुरात जपून ठेवल्या आहेत शिवाजी महाराजांच्या अस्थी...आजही शिवभक्त घेतात दर्शन!

Mumbai Local: लोकल कोंडीतून सुटका कधी? ‘एमयूटीपी’वर आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च; गर्दी कायम

SCROLL FOR NEXT