Ranji Trophy Quarter Final Round IPL Star Flop Show On Day One
Ranji Trophy Quarter Final Round IPL Star Flop Show On Day One  esakal
क्रीडा

Ranji Trophy : आयपीएल स्टार रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी फेल

अनिरुद्ध संकपाळ

बंगळुरू : आयपीएलचा 15 वा हंगाम संपल्या संपल्या बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा रणजी ट्रॉफीची बाद फेरी आयोजित केली. आज रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीचा पहिलाच दिवस होता. काही अपवाद वगळता आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीचं नाणे खणखणीत वाजून दाखवणारे स्टार रणजी ट्रॉफीत गळपटले. बाद फेरीसाठी बंगाल, झारखंड, मुंबई, उत्तराखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश पात्र झाले आहेत. (Ranji Trophy Quarter Final Round IPL Star Flop Show On Day One)

बंगाल विरूद्ध झारखंड

बंगालच्या सुदीप कुमार घारामीने नाबाद शतक ठोकत झारखंड विरूद्ध एक विकेट गमावून 310 धावा केल्या. सलामीवीर अभिषेक रमन आणि कर्णधार अभिमन्यू ईश्वरन यांनी दमदार सुरूवात करत पहिल्या 10 षटकात 47 धावा केल्या होत्या. मात्र 25 व्या षटकात रमन दुखापत झाल्याने रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर ईश्वरन 124 चेंडूत 65 धावा करून बाद झाला. त्यानंतर घारामी आणि अनुस्तूप मजूमदारने 178 धावांची नाबाद भागीदारी रचली. घारामीने 204 चेंडूत 13 चौकार, 1 षटकार मारत 106 धावा केल्या. मजूमदारने 139 चेंडूत 85 धावा केल्या.

मुंबई विरूद्ध उत्तराखंड

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने पहिल्या दिवशी 3 विकेट गमावून 304 धावा केल्या. युवा फलंदाज सुवेद पारकरने 104 धावा ठोकून शतकी खेळी केली. तो अजूनही नाबाद आहे. सुवेदचा हा मुंबईकडून रणजी ट्रॉफीमधील पहिलाच सामना आहे. दुसऱ्या बाजूला सर्फराज खानने पुन्हा एकदा दमदार खेळी करत नाबाद 69 धावा केल्या आहेत. मात्र कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैसवाल हे दोन आयपीएल स्टार प्रत्येकी 21 आणि 35 धावा करून हाद झाले. अरमान जाफरने 60 धावांची खेळी केली.

कर्नाटक विरूद्ध उत्तर प्रदेश

डावखुरा फिरकीपटू सौरब कुमार आणि वेगवान गोलंदाज शिवम मावी यांनी मिळून प्रथम फलंदाजी करणाऱ्या कर्नाटकचे पहिल्याच दिवशी 213 धावात सात फलंदाज तंबूत धाडले. सौरभने चार तर मावीने तीन विकेट घेतल्या. कर्नाटककडून खेळणाऱ्या रविकुमार समर्थने 57 धावांची खेळी केली. मात्र मयांक अग्रवाल 10 श्रेयस गोपाल 26 करूण नायर 29 आणि मनिष पांडे 27 धावा करून बाद झाले.

पंजाब विरूद्ध मध्य प्रदेश

पंजाबचा पहिला डाव मध्य प्रदेशने पहिल्याच दिवशी 219 धावात गुंडाळला. पंजाबकडून अभिषेक शर्मा आणि अनमोलप्रीत सिंगने प्रत्येकी 47 धावांची खेळी केली. मात्र आयपीएल विजेत्या गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल 9 धावा करून बाद झाला. मध्यप्रदेशकडून पुनित दातेय आणि अनुभव अग्रवालने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर अडचणीत? ठाकरे गटाने पाठवली नोटीस; नेमकं काय आहे प्रकरण?

Sharad Pawar On PM Modi Offer: PM मोदींच्या सोबत येण्याच्या ऑफरवर शरद पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, 'PM मोदींमुळे....'

Hardik Pandya: हार्दिकला कसा मिळाला BCCI चा 'अ' श्रेणीचा करार? जय शाहांनी सांगितलं काय होती अट..

Mumbai Local: "एक अबोल प्रेम कथा"; 'मुंबई लोकल' मध्ये झळकणार ज्ञानदा अन् प्रथमेश परब, पोस्टरनं वेधलं लक्ष

Narendra Dabholkar Case Live Updates: अर्बन नक्षलवाद्यांचा डाव फसला, सनातन संस्थेचा आरोप

SCROLL FOR NEXT