SL vs AFG Rashid Khan Angry Danushka Gunathilaka sakal
क्रीडा

Video : राशिद खानची श्रीलंकेच्या खेळाडू सोबत भर मैदानात भांडण

राशिद खान आणि दनुष्का गुनाथिलका यांच्यात भांडण झाल्याने SL vs AFG सामन्याचे वातावरण तापले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Kiran Mahanavar

SL vs AFG Rashid Khan Angry Danushka Gunathilaka : आशिया कप 2022 चे सुपर-4 सामने सुरू झाले आहेत. शनिवारी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला, ज्यात लंकेने 4 विकेटने विजय मिळवला. हा सामना अटीतटीचा ठरला आणि शेवटपर्यंत दोन्ही संघांनी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अशा स्थितीत दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये भांडणही झाली. अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खानचा श्रीलंकेचा फलंदाज दानुष्का गुनाथिलकासोबत वाद झाला त्यावेळी या सामन्याचे वातावरण तापले.

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले, जे श्रीलंकेने 6 गडी गमावून पूर्ण केले. श्रीलंकेने हा सामना 5 चेंडू राखून जिंकला. मात्र सामन्याच्या 17व्या षटकात राशिद खान रागाने लाल झाला होता. या षटकात रशीद गोलंदाजी करत होता आणि श्रीलंकेचा स्टार फलंदाज दानुष्का गुनाथिलकाने त्याच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप चौकार मारला. यावर रशीद अजिबात खूश नव्हता आणि स्वतः काहीतरी बडबडला. त्यानंतर या दोघांमध्ये जबरदस्त भांडण पाहायला मिळाली. शेवटी पंचांना बचावासाठी मधी यावे लागले.

रशीद कोठे या वादानंतर शांत राहणार होता? दानुष्का कडून चौकार खाल्ल्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवर रशीदने त्याला क्लीन बोल्ड केले. दनुष्का गुणातिलकाने 20 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. आशिया कप 2022 मध्ये अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात हा दुसरा सामना खेळला गेला. याआधी दोन्ही संघांमध्ये गटसाखळीत सामना रंगला होता. त्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव केला होता. श्रीलंकेचा संघ आता आपला पुढचा सामना टीम इंडियाविरुद्ध 6 सप्टेंबरला खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT