Ravi Shastri esakal
क्रीडा

कुलदीपची प्रशंसा अश्विनला टोचली याचा मला आनंदच : शास्त्री

'प्रशिक्षक जर तुम्हाला आव्हान देत असेल तर तुम्ही घरी जाऊन रडत बसणार?'

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विदेशातील सर्वात चांगला फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) का पसंती दिली याचा खुलासा केला. अश्विनने (R Ashwin) काही दिवसांपूर्वीच रवी शास्त्रींनी २०१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर केलेल्या वक्तव्यामुळे आपण मानसिक तणावात आलो होते अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आता रवी शास्त्रींनी सांगितले की त्यावेळी हा चायनामन गोलंदाज संधीचा हकदार होता. कारण त्यावेळी तो चांगली गोलंदाजी करत होता. (Ravi Shastri Reaction on R Ashwin Statement)

अश्विनच्या ऐवजी कुलदीप यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संधी देण्यात आली होती. या डावखुऱ्या गोलंदाजाने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत ५ विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात पावसाने ऑस्ट्रेलियाला मोठ्या पराभवापासून वाचवले होते. भारताने या कसोटीत पूर्ण चार दिवस आपला दबदबा ठेवला होता.

यादरम्यान, झालेल्या पत्रकार परिषदेत रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) भारताचा विदेशातील सर्वात चांगला कसोटीतला फिरकी गोलंदाज म्हणून नावाजले होते. यावर अश्विनने नंतर नाराजी व्यक्त केली होती. शास्त्रींच्या या वक्तव्याने आपण मानसिक ताणावात गेलो होते असे तो म्हणाला होता.

मात्र रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) अश्विनच्या या वक्तव्यावर आपल्याला कोणताच पश्चाताप झालेला नाही असे स्पष्टपणे सांगितले. त्यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अश्विनला वगळण्यात आल्यानंतर त्याची कसोटीमधील कामगिरी सुधारली असे वक्तव्य केले.

रवी शास्त्री म्हणाले की, 'अश्विन सिडनी कसोटीत खेळला नाही. आणि कुलदीप यादवने दमदार गोलंदाजी केली. त्यामुळे कुलदीपला (Kuldeep Yadav) संधी देणे योग्य होते. याने जर अश्विनला वेदना झाल्या असतील तर मला याचा आनंदच आहे. यामुळे त्याला वेगळे काहीतरी करण्याची उर्मी दिली. माझे काम कोणालाही मस्का लावणे नाही. माझे काम जे सत्य आहे ते कोणताही हेतू मनात न ठेवता सांगणे हे आहे.'

शास्त्री (Ravi Shastri) पुढे म्हणाले की, 'जर प्रशिक्षक तुम्हाला आव्हान देत असेल तर तुम्ही काय करायला हवे? घरी जाऊन रडत बसणार आणि मी परत येणार नाही. मी खेळाडू म्हणून याकडे आव्हान म्हणून पाहले असते. मी प्रशिक्षकांचे म्हणणे कसे खोटे आहे हे सिद्ध करुन दाखवले असते. जर कुलदीपबाबत केलेल्या माझ्या वक्तव्यामुळे अश्विन दुखावला गेला असेल तर मी हे वक्तव्य केल्याचा मला आनंदच आहे. त्यामुळे त्याला वेगळं काहीतरी करण्याची उर्मी मिळाली.'

कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) सिडनी कसोटीनंतर फारशी चमकदार कामगिरी केली नाही. त्यामुळे त्याला कसोटी संघातील आपले स्थानही गमवावे लागले. मात्र अश्विनने (R Ashwin) संघात पुनरागमन करत संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अश्विनवर मोठी जबाबदारी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT