Ravi Shastri Statement about Sourav Ganguly Not Wining World Cup
Ravi Shastri Statement about Sourav Ganguly Not Wining World Cup esakal
क्रीडा

Video: 'सौरभ गांगुलीने कुठे वर्ल्डकप जिंकलाय म्हणून काय तो...'

अनिरुद्ध संकपाळ

मस्कत : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यापासून अनेक वक्तव्ये केली आहे. रवी शास्त्री सध्या लेजंड क्रिकेट लीग (LCL) स्पर्धेसाठी मस्कत येथे आहेत. या दरम्यान त्यांनी एएनआयशी बोलताना विराट कोहली आणि सौरभ गांगुली (Sourav Ganguly) यांच्याबद्दल वक्तव्य केले. याबाबतचा व्हिडिओ एएनआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. (Ravi Shastri Statement about Sourav Ganguly Not Wining World Cup)

या व्हिडिओत त्यांनी 'आतापर्यंत किती लोकांनी वर्ल्डकप जिंकला आहे सांगा. सौरभ गांगुली, राहुल द्रविड (Rahul Dravid), लक्ष्मण या दिग्गज खेळाडूंनाही वर्ल्डकप जिंकता आला नाही. म्हणजे ते काही खराब खेळाडू झाले नाहीत. सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) एक वर्ल्डकप जिंकण्यासाठी सहा वर्ल्डकप खेळावे लागले. आपल्याकडे फक्त २ वर्ल्डकप विजेते कर्णधार आहेत.' असे म्हणत आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकली नाही म्हणून विराट कोहलीकडून नेतृत्व काढून घेतल्याच्या तर्काला काऊंटर केले. (Ravi Shastri Statement about Sourav Ganguly)

याचबरोबर एएनआयशी बोलताना रवी शास्त्री यांनी 'अनेक खेळाडूंनी विराट कोहलीबद्दल त्याच्या नेतृत्व सोडण्याबद्दल वक्तव्ये केली आहेत. मला असे गॉसिपिंग करण्याचा वेळ नाही. मी सात वर्षानंतर ब्रेक घेतला आहे. मी संघाचा एक भाग होतो. मी संघातील धुणी सार्वजनिकरित्या धुणार नाही. ज्यावेळी मी संघातून बाहेर पडलो त्यावेळी मी माझी पाटी कोरी केली. मी माझ्या खेळाडूंबद्दल सार्वजनिकरित्या बोलणार नाही. मी याबाबत फारच स्पष्ट आहे.' असे वक्तव्य करत ड्रेसिंग रूममधील वाद ड्रेसिंग रूममध्येच राहतील असे स्पष्ट संकेत दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT