ICC Test Ranking Ravichandran Ashwin esakal
क्रीडा

ICC Test Ranking Ashwin : अँडरसन ठरला औट घटकेचा राजा! अश्विनने सिंहासन हिसकावले

अनिरुद्ध संकपाळ

ICC Test Ranking Ravichandran Ashwin : आयसीसी कसोटी रँकिंगची नुकतीच घोषणा झाली होती. त्यावेळी इंग्लंडचा 40 वर्षाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन कसोटी गोलंदाज क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला होता. त्याने न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी केली होती. मात्र वेलिंग्टन कसोटीत कामगिरी घसरल्यामुळे त्याचा अव्वल स्थान गेले.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत अश्विनने दमदार कामगिरी केली होती. त्याचा फायदा अश्विनला झाला असून आता तो कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे. 36 वर्षाच्या अश्विनने सर्वात प्रथम 2015 ला कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. तो त्यानंतर अनेकवेळा अव्वल स्थानापर्यंत पोहचला आहे.

अश्विनने दिल्ली कसोटीत दमदार गोलंदाजी करत मार्नस लाबुशाने आणि स्टीव्ह स्मिथला एकाच षटकात बाद केले होते. त्याने अॅलेक्स कॅरीला देखील शुन्यावर बाद केले. अश्विनने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर उडवली होती. त्याने रविंद्र जडेजाच्या साथीने ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवून दिली होती.

आता अश्विनला आपले अव्वल स्थान अबाधित राखण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध अजून मायदेशात दोन कसोटी सामने शिल्लक आहेत. त्यामुळे अश्विनकडे नामी संधी आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday : पुढील आठवड्यात कधी असणार बँकांना सुट्टी? ; जाणून घ्या, महत्त्वाची माहिती अन्यथा खोळंबतील कामे

चार हजार मीटर खोल समुद्रात १६० दिवस राहिले वैज्ञानिक; प्रशांत महासागरात जे दिसलं त्याने सगळेच हादरुन गेले

इंदू मिल स्मारकाबाबत मोठी अपडेट! डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम कधी पूर्ण होईल? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

IND vs SA 3rd ODI: जैस्वालचं शतक अन् विराट-रोहितची फिफ्टी; भारताने दणदणीत विजयासह द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Mercedes accident Video: भरधाव मर्सिडिज दुभाजकाला धडकून रॉकेटसारखी दोन कार वरून उडाली अन्...

SCROLL FOR NEXT