Ravichandran Ashwin Statement about Next Generation getting 1000 international wickets  esakal
क्रीडा

पुढच्या पिढीने 1000 विकेट्सचे स्वप्न बाळगू नये : अश्विन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) नुकतेच कपिल देव यांचे कसोटीत 434 विकेट्सचे रेकॉर्ड तोडले. मात्र याच आर. अश्विनने क्रिकेटमध्ये भविष्यात कोणी 1000 विकेट (1000 International Wickets) घेऊ शकेल याची शक्यता वाटत नाही असे सांगितले.

मोहालीत नुकताच विराट कोहलीने (Virat Kohli) आपला 100 वा कसोटी सामना खेळला. त्यावेळी त्याने 'सध्याच्या काळात तीन प्रकारात क्रिकेट खेळावे लागते. त्यानंतर आयपीएल (IPL) देखील आहेच. अशा परिस्थिती पुढच्या पिढीतील खेळाडूंनी माझ्या कारकिर्दितून मी अशा परिस्थितीतही कसोटी क्रिकेट इतक्या काळ खेळलो हे घेण्यासारखे आहे.' असे वक्तव्य केले होते.

विराट पाठोपाठ आर अश्विनने (R. Ashwin) देखील पुढच्या पिढीतील गोलंदाजांना शेन वॉर्न (Shane Warne) आणि मुथय्या मुरलीधरन यांच्यासारखे 1000 विकेट्स घेणे अत्यंत कठिण होणार आहे. अश्विनने शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर आपल्या यू ट्यूब चॅनेलवरून एक कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमात अश्विन म्हणाला 'शेन वॉर्न हे रंगिले कॅरेक्टर होते. त्याने लेग स्पिनची परिभाषाच बदलली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास 1000 पेक्षा जास्त विकेट घेतल्या. अशी कामगिरी फार थोडे लोकच करू शकतात. खरं सांगायचं तर पुढच्या पिढीच्या गोलंदाजांनी 1000 आंतरराष्ट्रीय विकेट घेणे आता विसराचे.'

तो पुढे म्हणाला की, फिरकीपटूला महारत मिळवायला नेटमध्ये सातत्याने गोलंदाजी करावी लागते. जर तुम्ही लेग स्पिनर असाल तर तुम्हाला जास्तच मेहनत करावी लागते. शेन वॉर्नचा खांदा शक्तीशाली होता याचा त्याला मोठा फायदा झाला.'

अश्विन पुढे म्हणाला की, 'कसोटी क्रिकेट सामन्यांची संख्या झपाट्याने घटणार आहे. तसेच अनेक प्रकारच्या लीग क्रिकेटमुळे वर्कलोड मॅनेजमेंट हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.' अश्विनने नुकतेच कपिल देव यांचे 434 कसोटी विकेट्सचे रेकॉर्ड तोडले. अश्विनच्या आता 648 आंतरराष्ट्रीय विकेट्स झाल्या आहेत. शेन वॉर्नने दोन क्रिकेट फॉरमॅट खेळून 1001 विकेट घेतल्या होत्या. मुथय्या मुरलीधरनने तीन फॉरमॅटमध्ये 1347 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. तर अनिल कुंबळेने 956 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT