Ravindra Jadeja highest test inning score at no 7 position for India  esakal
क्रीडा

... तर सर जडेजा डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तीत बसला असता

अनिरुद्ध संकपाळ

रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) श्रीलंकेविरूद्धच्या (India vs Sri Lanka) पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला. भारताकडून रविंद्र जडेजाने दमदार फलंदाजी करत नाबाद 175 धावा ठोकल्या. रविंद्र जडेजाचे हे कारकिर्दितील दुसरे कसोटी शतक आहे. त्याने आपल्या दुसऱ्याच कसोटी शतकात कपिल देव, गिलख्रिस्ट आणि इयान हिली या दिग्गजांना मागे टाकले. (Ravindra Jadeja Broke Kapil Dev Record)

रविंद्र जडेजाने 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत एका डावात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नावावर होता. त्यांनी 1986 च्या कानपूर कसोटीत 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत श्रीलंकेविरूद्धच 163 धावांची खेळी केली होती. रविंद्र जडेजाने श्रीलंकेविरूद्धच 175 धावांची नाबाद खेळी करत हा विक्रम मोडला.

जडेजाने कपिल देव यांच्याबरोबरच अॅडम गिलख्रिस्ट आणि इयान हिली यांना देखील मागे टाकले. गिलख्रिस्टने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत 162 तर हिली यांनी 161 धावांची खेळी केली होती. तर डेरेक विलियम रान्डेल (164), दिनेश रामदीन (166) यांना देखील मागे टाकले. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी सातव्या क्रमांकावर फलंदजीला येत 270 धावांची खेळी केली होती.

रोहित शर्माने भारताचा डाव घोषित केला नसता आणि रविंद्र जडेजाने द्विशतक ठोकले असते तर सर जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत द्विशतक ठोकणाऱ्यांच्या पंक्तीत जाऊन बसला असता. या यादी सर डॉन ब्रॅडमन 270 धावा करून अग्रस्थानी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Pune Metro Route : विमानतळ-कल्याणीनगर मेट्रोमार्ग निश्‍चित; सुरळीत वाहतुकीसाठी पौडफाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

SCROLL FOR NEXT