Ravindra Jadeja T20 World Cup  esakal
क्रीडा

Ravindra Jadeja : जडेजाच्या गुडघ्यावर होणार शस्त्रक्रिया, टी 20 वर्ल्डकपला मुकणार?

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja T20 World Cup : भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला होता. आता त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीवर (Knee Injury) शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तो ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपला देखील मुकण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले. दरम्यान, बीसीसीआयने याबाबत आजून कोणताही माहिती दिलेली नाही.

एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रविंद्र जडेजा आगामी टी 20 वर्ल्डपला मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या दुखऱ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला क्रिकेटपासून खूप काळ दूर रहावे लागणार आहे.' ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबरपासून टी 20 वर्ल्डकप सुरू होणार आहे. रविंद्र जडेजाच्या उजव्या घुडघ्याला दुखापत झाली आहे. सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथाच्या देखरेखीखाली रविंद्र जडेजा आपल्या दुखऱ्या गुडघ्यावर उपचार घेत आहे.

दरम्यान, युएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कपमध्ये रविंद्र जडेजा भारताच्या पहिल्या दोन सामन्यात खेळला होता. त्याने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात 35 धावांची सामना जिंकून देणारी खेळी देखील केली होती. मात्र हाँगकाँगविरूद्धच्या सामन्यानंतर रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त आले. त्यावेळी तो संपूर्ण आशिया कपसाठी मुकणार असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेलला संघात संधी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT