Ravindra Jadeja esakal
क्रीडा

Ravindra Jadeja : पहिल्या दिवसापासूनच मी कर्णधारासारखा विचार करतो मात्र... जडेजाने कोणाला काढला चिमटा?

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja : रविंद्र जडेजाने इडन गार्डनवर दमदार कामगिरी केली. त्याने दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात 33 धावात पाच विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. फिरकीपटूंना पोषक खेळपट्टीवर दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांपेक्षा रविंद्र जडेजा सरस ठरला.

भारताने प्रथम फलंदाजी करत 327 धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा 83 धावात खुर्दा उडवला. भारताने सामना 243 धावांनी जिंकत गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान पक्के केले.

रविंद्र जडेजाने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 14 विकेट्स आणि महत्वाच्या क्षणी फलंदाजी करत 110 धावा केल्या आहेत. जडेजा हा युवराज सिंगनंतर वर्ल्डकपमध्ये 5 विकेट्स घेणारा भारताचा दुसरा फिरकीपटू ठरला आहे.

दरम्यान, सामन्यानंतर रविंद्र जडेजाने भन्नाट प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'पहिल्या दिवसापासूनच मी कर्णधारासारखा विचार करतोय मात्र मी कर्णधार नाही ही दुसरी गोष्ट. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून 30 - 35 धावा करणे आणि भागीदारी तोडणे ही माझी जबाबदारी आहे. मी कायम प्रभावी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.'

'मी फिल्डिंग करताना सर्व गोष्टी गृहीत धरत नाही. मी झेल देखील सोडू शकतो. मी देखील झेल सोडू शकतो त्यामुळे मी कायम सतर्क राहण्याचा प्रयत्न करत असतो. मी जरी झेल घेतला तरी मी निवांत होत नाही. मी कायम प्रयत्नशील राहतो. मी कधी यशस्वी होईन कधी नाही. मात्र मी कायम प्रयत्न करत राहतो.'

रविंद्र जडेजाच्या मते त्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेविरूद्ध महत्वाच्या विकेट्स घेणे आणि न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात कठिण परिस्थितीत धावा करणे हे खूप महत्वाचे आहे. तो म्हणाला, 'गेल्या काही सामन्यात माझा रिदम चांगला आहे. मी आनंदी आहे की मी संघासाठी आपले योगदान देऊ शकलो. मी फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी करतोय. येणाऱ्या सामन्यात देखील मी चांगली कामगिरी करणार असा विश्वास मला आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT