Ravindra Jadeja Asia Cup 2022 esakal
क्रीडा

Ravindra Jadeja : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja Asia Cup 2022 : आशिया कप 2022 मध्ये रविवारी 4 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे उर्वरित आशिया कपलाच मुकणार आहे. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली असल्याची माहिती बीसीसीआयने आज दिली. रविंद्र जडेजा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. बीसीसीआयने अक्षर पटेलला रविंद्र जडेजाची रिप्लेसमेंट म्हणून उर्वरित आशिया कपमध्ये संधी देणार असल्याची घोषणा केली आहे.

बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या आपल्या वक्तव्यात 'भारताच्या वरिष्ठ निवडसमितीने उर्वरित आशिया कपच्या सामन्यांसाठी दुखापतग्रस्त रविंद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संघात स्थान दिले आहे. रविंद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे. तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली आहे. अक्षर पटेलला आशिया कपसाठी स्टँड बाय म्हणून संघासोबत ठेवण्यात आले होते. तो लवकरतच दुबईत संघात दाखल होईल.'

आशिया कपमधील पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात रविंद्र जडेजाने 35 धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली होती. मात्र त्याला विकेट घेण्यात अपयश आहे. हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यात रविंद्र जडेजाला फक्त 1 विकेट घेण्याची संधी मिळाली. तर भारताचे दोनच फलंदाज बाद झाल्याने त्याला फलंदाजी करण्याची देखील संधी मिळाली नाही.

आज पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात ग्रुप A मधील अंतिम सामना होणार आहे. यासामन्यातील विजेत्या संघासोबत भारत 4 सप्टेंबरला सुपर 4 मध्ये भिडणार आहे. सुपर 4 च्या सुपर संडेमध्ये पाकिस्तान भारतासोबत भिडेल याची जास्त शक्यता आहे.

आशिया कपसाठीचा भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT