Virat Kohli Car Collection  esakal
क्रीडा

Virat Kohli Car Collection : विराट कोहलीने महागड्या गाड्या काढल्या विकायला; म्हणतो गरज...

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Car Collection : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा महेंद्रसिंह धोनीसारखा महागड्या गाड्यांचा चाहता होता. धोनी इतके मोठे जरी त्याचे कार कलेक्शन नसले तरी त्याच्याकडे देखील जगतील सर्वात महागड्या गाड्यांचा चांगला ताफा होता. मात्र विराट कोहलीने हा महागडा ताफा आता विकायला काढला आहे. याबाबतची माहिती विराट कोहलीने आरसीबीच्या बोल्ड डायरीज या कार्यक्रमात केला.

विराट कोहली सध्या आयपीएल 2023 च्या हंगामाची तयारी करत आहे. यावेळी आरसीबीच्या टीम फोटोशूटवेळी आरसीबी बोल्ड डायरीज या कार्यक्रमात बोलताना विराट कोहलीने आपल्या कार कलेक्शनबद्दल माहिती दिली. तो म्हणाला की, 'माझ्याकडील अनेक गाड्या मी भावनेच्या भरात घेतल्या होत्या. मात्र मी या गाड्यांचा वापरच करू शकलो नाही. मी या गाड्यांमधून फार कमी काळ प्रवास केला किंवा त्या चालवल्या.'

विराट पुढे म्हणाला की, 'एका काळानंतर मला अशा गाड्या बाळगणे निर्थक वाटू लागले. त्यामुळे मी त्यातील अनेक गाड्या विकायला काढल्या. आता मी फक्त ज्या गाड्यांची गरज आहे त्याच गाड्या वापरतोय. मला वाटते की हा एक वाढच्या वयाबरोबर सजग होण्याचा भाग आहे. आता तुम्हाला खेळणी नको असतात तुम्ही जास्त व्यावहारिक होता.'

(Sports Latest News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : कोल्हापुरात खासगी बसला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT