Ricky Ponting England Coach esakal
क्रीडा

Ricky Ponting : ..तर मॅक्युलम नाही पाँटिंग असता इंग्लंडचा प्रशिक्षक, रिकीने का नाकारली ऑफर?

अनिरुद्ध संकपाळ

Ricky Ponting England Coach : इंग्लंडने जेव्हापासून ब्रँडन मॅक्युलमला आपल्या कसोटी संघांचा प्रशिक्षक बनवले आहे तेव्हापासून इंग्लंड एक वेगळ्यात थाटात कसोटी क्रिकेट खेळत आहे. त्यांनी आतापर्यंत 14 सामन्यापैकी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र ज्यावेळी इंग्लंड संघाचा प्रशिक्षक बदलण्याची चर्चा सुरू होती त्यावेळी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ब्रँडन मॅक्युलमला पहिली पसंती दिली नव्हती. याबाबतचा खुलासा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने केला आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मॅक्युलपूर्वी रिकी पाँटिंगला इंग्लंडच्या संघाचा प्रशिक्षक होण्याची ऑफर दिली होती. खुद्द ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार रिकी पाँटिंगनेच याबाबत खुलासा केला आहे. मॅक्युलमने प्रशिक्षक म्हणून कार्यभार सांभाळण्यापूर्वी इसीबीने माझ्याशी संपर्क साधला होता असे पाँटिंग म्हणाला.

रिकी पाँटिंग म्हणाला की, 'ज्यावेळी रॉबर्ट यांनी कार्यभार सांभाळला त्यावेळी त्यांनी मला फोन केला होता. मात्र मी आयुष्याच्या या टप्प्यावर पूर्णवेळ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाची नोकरी करण्यासाठी तयार नाहीये. मी छोट्या मुलांना सोडून खूपवेळा परदेशी दौऱ्यावर गेलो आहे. आता मला त्यांच्यापासून फार दूर रहायचं नाहीये.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT