Rinku Singh Ruturaj Gaikwad Asian Games 2023 esakal
क्रीडा

Rinku Singh Ruturaj Gaikwad : रिंकू - ऋतुसाठी निवडसमितीचं मोठं प्लॅनिंग; थेट चीनलाच पाठवणार

अनिरुद्ध संकपाळ

Rinku Singh Ruturaj Gaikwad Asian Games 2023 : वेस्ट इंडीज दौऱ्यावरील पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच झाली. या संघात चेन्नई सुपर किंग्जचा स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि कोलकाता नाईट राडर्सचा मॅच फिनिशर रिंकू सिंहचा समावेश करण्यात आलेला नाही. या दोघांनीही आयपीएलच्या 16 व्या हंगामात चांगली कामगिरी केली होती.

ऋतुराजला कसोटी संघात स्थान देण्यात आले मात्र त्याला टी 20 संघासाठी डावलण्यात आले. तर रिंकू सिंहला वेस्ट इंडीज दौऱ्यावर संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र ही फक्त चर्चाच राहिली. निवडसमितीने तिलक वर्मा आणि यशस्वी जैस्वालला वेस्ट इंडीजविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी संधी दिली आहे. रिंकूला संधी न दिल्याने त्याचे चाहते नाराज झाले होते.

मात्र बीसीसीआयच्या निवडसमितीने रिंकू सिंह, ऋतुराज गायकवाड आणि जितेश शर्मासाठी एक वेगळं प्लॅनिंग केलं आहे. या तिघांचीही चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स 2023 साठी पाठवल्या जाणाऱ्या संघात निवड होण्याची शक्यता आहे. हा संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळेल. बीसीसीआयला यासाठी 15 जुलैपर्यंत ऑलिम्पिक काऊन्सील ऑफ आशियाकडे खेळाडूंची यादी सादर करायची आहे.

भारतात होणारा वनडे वर्ल्डकप 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यादरम्यानच एशियन गेम्स देखील होणार आहे. यंदाच्या एशियन गेम्ससाठी बीसीसीआयने आपले पुरूष आणि महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पुरूषांचा दुसऱ्या फळीतील संघ तर महिलांचा मुख्य संघ या स्पर्धेत उतरेल.

पुरूषांच्या टी 20 संघात शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, जितेश शर्मासह रिंकू सिंह, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, राहुल चाहर, तिलक वर्मा यांचाही वर्णी लागण्याची शक्यता आहे. गायकवाड, जितेश शर्मा, रिंकू सिंह यांनी 2023 च्या आयपीएल हंगामात चांगली कामगिरी केली आहे. ऋतुराजने 16 सामन्यात 590 धावा केल्या. तर जितेशने 309 आणि रिंकूने 474 धावा केल्या आहेत. या तिघांना वेस्ट इंडीज दौऱ्यावरील टी 20 मालिकेत स्थान मिळाले नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT