Rishabh Pant Accident sakal
क्रीडा

Rishabh Pant Accident: अपघातानंतर पंत IPL अन् ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर?

Kiran Mahanavar

Rishabh Pant Accident : टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आहे, स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीचा दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेवर त्याच्या कारला अपघात झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या कपाळाला आणि पायाला दुखापत झाली आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी 2023 मध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2023 दरम्यान नागपुरात खेळल्या जाणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमधला सर्वात मोठा मॅचविनर ऋषभ पंतला या मालिकेत खेळणे खूप कठीण आहे.

याशिवाय ऋषभ पंतसाठी आयपीएल 2023 च्या हंगामही खेळणे कठीण मानले जात आहे. ऋषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. ऋषभ पंतची कार रेलिंगला धडकली त्यानंतर कारला आग लागली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऋषभ पंतला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेतून वगळण्यात आले आहे कारण फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बॉर्डर गावसकर करंडक स्पर्धेपूर्वी त्याला एनसीएमध्ये सामील व्हायचे आहे. ऋषभ पंतसोबत एवढा मोठा अपघात होईल, असा विचारही कुणी केला नव्हता. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताच्या विजयात ऋषभ पंतचा मोठा वाटा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

Maharashtrta News : राज्याचा साखर उतारा वाढला; दीड महिन्यात ३० लाख टन साखरनिर्मिती!

Liver, Kidney, Gut Detox: फक्त १४ दिवसांत करा सगळं शरीर स्वच्छ! आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं सर्वात सोपं डिटॉक्स ड्रिंक

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT