Rishbah-Pant 
क्रीडा

व्वा पंत.. मान गये आपको!! ट्विटरवर ऋषभ भाऊंची 'फुल्ल ऑन हवा'

व्वा पंत.. मान गये आपको!! ट्विटरवर ऋषभ भाऊंची 'फुल्ल ऑन हवा' विराट स्लिपमध्ये उभा असताना पंतसोबत एक किस्सा घडला... Rishabh Pant Convince Virat Kohli for DRS start trending on Twitter Users share hilarious memes see tweets vjb 91

विराज भागवत

IND vs ENG 1st Test: विराट स्लिपमध्ये उभा असताना पंतसोबत एक किस्सा घडला...

Ind vs Eng 1st Test: भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने टीम पेनला दिलेलं उत्तर चाहत्यांच्या आजही लक्षात असेल. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध जी खेळी केली त्यामुळे संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा पंतच्या वाट्याला गेला नाही. आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली. या सामन्यात विराट कोहली स्लिपमध्ये उभा असताना पंतसोबत एक असा किस्सा घडला की ऋषभ पंत काही वेळातच सोशल मिडियावर चर्चेत आला.

नक्की असं घडलं तरी काय?

मोहम्मद सिराजची गोलंदाजी सुरू होती. त्यावेळी षटकाच्या चौथ्या चेंडूवर सिराजचा स्विंग झालेला चेंडू क्रॉलीच्या बॅटजवळून पॅडला घासून गेला. तेव्हा विराटने विश्वासाने अपील केले पण अंपायरने नाबाद ठरवल्यानंंतर विराटने DRS घेतला आणि तो फुकट गेला. त्याच्या दोनच चेंडूनंतर पुन्हा चेंडू स्विंग झाला आणि पंतने झेल पकडला. यावेळी विराटला समजेना की DRS घ्यावा की घेऊ नये. त्यावेळीच ऋषभ पंतने अतिशय पोटतिडकीने विराटला DRS साठी मनवलं. पंत मागेच लागलेला पाहून विराटने DRS तर घेतला. पण दोन चेंडूंपूर्वीच एक DRS वाया गेला असल्याने सगळेच गोंधळलेले होते. अखेर ज्यावेळी रिव्ह्यू पाहिला गेला तेव्हा चेंडू बॅटला लागल्याचे निष्पन्न झाले आणि त्यामुळे क्रॉलीला माघारी परतावे लागले.

पंतने DRS घेण्यासाठी विराटला उद्युक्त केलं नसतं तर कदाचित विराटने स्वत:हून DRSचा निर्णय घेतला नसता. कारण दोन चेंडूंआधी तो निर्णय फसला होता. DRS संदर्भातील जो प्रकार घडला त्या प्रकारानंतर पंतचा सोशल मिडियावर उदो उदो करण्यात आला. ऋषभ पंतसारख्या तरूण खेळाडूंच्या बोलण्याचा मान ठेवून विराटने DRS घेतल्यामुळे सोशल मिडियावर विराटबद्दलही सकारात्मक कमेंट्स दिसून आल्या.

दरम्यान, भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने संथ खेळीने डावाची सुरूवात केली. पहिल्या सत्रात इंग्लंडने दोन गड्यांच्या मोबदल्यात ६१ धावा केल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पहिल्याच षटकात रॉरी बर्न्सला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर जॅक क्रॉली आणि डॉम सिब्ली या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण क्रॉलीदेखील लंचटाईमच्या आधी बाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT