Rishabh Pant feeling relaxed After BCCI Removed Bio Bubble  esakal
क्रीडा

आता पुन्हा नको रे बाबा! म्हणत ऋषभ पंतने सोडला सुटकेचा निश्वास

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताचा स्टार विकेटकिपर बॅट्समन ऋषभ पंतने बीसीसीआयच्या एका निर्णयामुळे सुटकेचा निश्वास सोडला. बीसीसीआयने नुकतेच टीम इंडियाला बायो बबलमधून बाहेर काढले आहे. आगामी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेत टीम इंडियावर बायो बबलची बंधणे असणार नाहीत. (Rishabh Pant feeling relaxed After BCCI Removed Bio Bubble)

देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या घटलेली पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संघातील विकेटकिपर बॅट्समन ऋषभ पंतने सुटकेचा निश्वास सोडला. पंत सध्या टीम इंडियाबरोबर दिल्लीत आहे. येत्या 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी 20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. मालिकेतला पहिला सामना अरूण जेटली मैदानावर होत आहे.

याबाबत पंत म्हणाला की, 'बायो बबलमधून बाहेर आल्यावर खूप समाधान वाटतयं. आता बायो बबल हा प्रकार पुन्हा नको. मला आशा आहे की पुन्हा बायो बबलमध्ये जावे लागणार नाही. मी मुक्त झाल्याचा आनंद घेत आहे. आम्ही खूप कठिण काळातून गेलो आहे.'

ऋषभ पुढे म्हणाला की, 'तुम्ही वर्षभर मोठ्या दबावात खेळत असता. अशावेळी तुम्हाला थोडा निवांतपणा गरजेचा असतो. जर तुम्ही तमचे मन ताजेतवाणे करू शकत नसाल तर तुम्ही तुमचे 100 टक्के योगदान देऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला आमचे मन ताजेतवाणे करणे गरजेचे असते.'

पंतला त्याच्या बलस्थानाबद्दल विचारले असता तो म्हणाला की, 'मी मैदानावर माझे 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. मी एक विकेटकिपर बॅट्समन आहे. मी लहाणपणापासूनच विकेटकिपिंग करत आलो आहे. माझे वडील देखील विकेटकिपरच होते. विकेटकिपिंग करण्याची प्रेरणा तेथूनच मिळाली.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT