Rishabh Pant Will Paly In India vs England Semi Final Dinesh Karthik Give Practice Drills esakal
क्रीडा

Dinesh Karthik : संघाची घोषणा झाली अन् डीके - पंतचा सामन्यापूर्वीचा तो व्हिडिओ आला चर्चेत

अनिरुद्ध संकपाळ

Dinesh Karthik : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेविरूद्धच्या संघात कोणताही बदल केले नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात ऋषभ पंत की दिनेश कार्तिक की दोघे या प्रश्नाचे उत्तर मिळाले. तसेही रोहित शर्माने याबाबतचे संकेत कालच्या पत्रकार परिषदेत दिले होते. दरम्यान, सामन्यापूर्वी दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतची एक व्हिडिओ क्लिप चर्चेत आली आहे.

आजच्या इंग्लंडविरूद्धच्या सेमी फायनल सामन्यात भारतीय संघाने मॅच फिनिशन दिनेश कार्तिकच्या ऐवजी डावखुरा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतला संधी दिली. दरम्यान, नाणेफेक होण्यापूर्वी भारतीय संघ सराव करत होता. त्यावेळे अनुभवी दिनेश कार्तिक हा पंतकडून विकेटकिपिंगचे ड्रिल्स करून घेत होता. यावेळीच आजच्या सामन्यात कोण विकेट किपिंगचे ग्लोज घालणार याचा अंदाज आला होता. मात्र या व्हिडिओवरून जरी दिनेश कार्तिकला आजच्या सामन्यात संधी मिळणार नसली तरी त्याने आपल्या परीने भारताच्या विजयासाठी खारीचा का असेना वाटा उचलला असल्याचे दिसून आले.

भारताची प्लेईंग 11

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT