Rohit Sharma T20I
Rohit Sharma T20I esakal
क्रीडा

Rohit Sharma : रोहितने धावा कमी केल्या मात्र एक माईल स्टोन देखील केला पार

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma : आशिया कपमध्ये भारत आपला दुसरा सामना हाँगकाँग विरूद्ध खेळत आहे. या सामन्यात हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम भारताला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि केएळ राहुल यांनी डावाची सावध सुरूवात केली. मात्र दोन षटकानंतर भारताने गिअर बदलला. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. मात्र पाचव्या षटकात आयुष शुक्लाने त्याला 21 धावांवर बाद केले. रोहित शर्माने जरी धावा कमी केल्या असल्या तरी त्याने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मोठा माईल स्टोन पार केला. (Rohit Sharma T20I Mile Stone 3500 Runs)

रोहित शर्माने आपल्या आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यांमधील 3500 धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करण्यासाठी रोहित शर्माने 134 सामने घेतले. विशेष म्हणजे टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल (121) 3497 धावा करून दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारताचा विराट कोहली 101 सामन्यात 3354 धावा करून तिसऱ्या स्थानावर आहे.

याचबरोबर रोहित शर्माने आशिया कपमध्ये देखील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे. आशिया कपमध्ये सर्वात जास्त सामने खेळणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा आता अव्वल स्थानावर आहे. आजचा हाँगकाँग विरूद्धचा त्याचा आशिया कपमधली 29 वा सामना आहे. यापूर्वी जवर्धनेने आशिया कपमध्ये सर्वाधिक म्हणजे 28 सामने खेळले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT