Rohit Sharma T20 World Cup esakal
क्रीडा

Rohit Sharma : रोहित शर्मा टी 20 वर्ल्डकप खेळण्याबाबत पत्रकार परिषदेत काय म्हणाला?

रोहित शर्माने 2024 चा टी 20 वर्ल्डकप खेळण्याबाबत दिले मोठे संकेत

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. या परिषदेच दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्याबरोबरच वनडे वर्ल्डकप, महिलांचा कसोटी विजय याच्यावरही रोहित बोलला. याचबरोबर त्याला टी 20 वर्ल्डकप 2024 खेळणार की नाही याबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, 'माझ्या समोर जे काही आहे ते मी खेळण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला कळतंय. याचं उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल.' रोहितच्या या उत्तरामुळे तो टी 20 वर्ल्डकप 2024 खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोहितने टी 20 वर्ल्डकप खेळण्याबाबत स्पष्ट उत्तर दिलं नसलं तरी त्याने सर्वांना खेळायचं आहे सर्व मुलांना चांगली कामगिरी करायची आहे असं सांगितलं. यावरून तो टी 20 वर्ल्डकप खेळण्याबाबत उत्सुक असल्याचे दिसते. याचबरोबर त्यानं आम्ही इतके कष्ट करतोय तर आम्हीला काहीतरी मोठं मिळालयला हवं असेही सांगितलं.

रोहित जरी हे सहज बोलून गेला असला तरी यातून टी 20 वर्ल्डकप खेळण्याची त्याची इच्छा असल्याचं स्पष्टपणे जाणवतं.

रोहित शर्माने या पत्रकार परिषदेत केएल राहुलच्या विकेटकिपिंगबद्दल देखील वक्तव्य केलं. तो म्हणाला की, 'राहुलने ज्या प्रकारे वर्ल्डकपमध्ये विकेटकिपिंग केली ते पाहता त्यानं आपल्या विकेटकिपिंगवर काम केलं आहे हे दिसतं. त्यानं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला मधल्या फळीत एक दमदार फलंदाज मिळाला आहे.

राहुल वनडेमध्ये मधल्या फळीत उत्तमरित्या फलंदाजी करतोय. तो परिस्थितीनुसार कशी फलंदाजी करायची हे त्याला माहिती आहे. तो किती काळ विकेटकिपिंग करणार हे मला माहितीनाही मात्र तो चांगलं करतोय.'

रोहित पहिल्या कसोटी सामन्यासाठीच्या टीम कॉम्बिनेशनबद्दल बोलताना म्हणाला की, आम्ही आमची 75 टक्के टीम निवडली आहे. उरलेली टीम आम्ही संघाच्या बैठकीत ठरवू.

(Latest Cricket News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT