Rohit Sharma Emotional IND vs PAK 
क्रीडा

IND vs PAK: मेलबर्नमध्ये राष्ट्रगीतादरम्यान रोहित भावूक, डोळ्यातून आले अश्रू, पहा Video

Kiran Mahanavar

Rohit Sharma Emotional IND vs PAK : मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना टीम इंडियाचे सर्व खेळाडू उत्साहात दिसत होते. त्याचवेळी कर्णधार रोहित भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. रोहित कसेतरी आपल्या भावनांवर आवर घालताना दिसला.

हा सामना जिंकून दोन्ही संघांना आपल्या मोहिमेची सुरुवात करायची आहे. भारताने रविचंद्रन अश्विनचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला आहे. युझवेंद्र चहल या सामन्यात खेळत नाही. हर्षल पटेललाही संघात ठेवण्यात आलेले नाही.

आतापर्यंत खेळलेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पॉवरप्ले संपला आहे. पहिल्या सहा षटकांत पाकिस्तानने दोन गडी गमावून 32 धावा केल्या. अर्शदीप सिंगने भारताला दोन यश मिळवून दिले. त्याने कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बाबरला खातेही उघडता आले नाही, तर रिझवानला केवळ चार धावा करता आल्या.

  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

  • पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway route villages : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांची यादी आली; असा आहे मार्ग

Maharashtra Education DA Arrears: शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ महागाई भत्ता थकबाकी मार्च २०२६ च्या वेतनासह देण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

Mumbai News : कुलगुरूंच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डीबाटू विद्यापीठाचे २०२५ मधील हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर

Gadchiroli Accident : अपघातात दांपत्याचा मृत्यू; सहा वर्षांची चिमुकली झाली पोरकी

SCROLL FOR NEXT