Rohit Sharma Jabra Fan sakal
क्रीडा

Rohit Sharma Fan : रोहितच्या जबरा फॅनला मैदानातील घुसखोरी पडली लाखात, पोलिसांनी...

मैदानाबाहेर जाताना या 'जबरा फॅन'च्या डोळ्यातही अश्रू आले...

Kiran Mahanavar

Rohit Sharma Jabra Fan : आपल्या आदर्श खेळाडूला भेटण्यासाठी 'चाहते' सर्व मर्यादा ओलांडतात असे क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा पाहायला मिळले आहे. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यादरम्यान एक भारतीय चाहता सुरक्षा भंग करताना रोहित शर्मापर्यंत पोहोचला. मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा 'जबरा फॅन' मैदानात उतरला, पण लाखो रुपयांचा दंड भरून त्याची भरपाई करावी लागेल हे त्याला माहीत नव्हते.

सामन्यादरम्यान मैदानात घुसल्यामुळे या 'जबरा फॅन'ला 6.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. झिम्बाब्वेच्या डावाच्या 17व्या षटकात ही घटना घडली. जेव्हा हा चाहता मैदानात घुसला तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्यांना चकमा देत रोहित शर्माच्या दिशेने जात होता. त्यानंतर एका गार्डने या 'जबरा फॅन'ला पकडले.

सुरक्षा कर्मचार्‍यांनी ते पकडल्यानंतर रोहित शर्मा ताबडतोब त्यांच्याकडे धावत गेला आणि त्यांनी या लहान फॅनला नीट बाहेर काढण्यास सांगितले. मैदानाबाहेर जाताना या 'जबरा फॅन'च्या डोळ्यातही अश्रू आले होते.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येसमोर त्यांचा संपूर्ण संघ 115 धावांत गारद झाला. या विजयासह भारताने गट-2 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. टीम इंडियाची आता सेमीफायनलमध्ये 10 नोव्हेंबरला इंग्लंडशी, तर 9 नोव्हेंबरला पाकिस्तानची न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : टीईटी परीक्षा बनली 'कमाईचा स्रोत'; शुल्कवाढीमुळे सरकारने ₹५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला!

Pimpri Metro: मेट्रोचा पादचारी पूल अद्याप अपूर्णच; मोरवाडी चौकात संथगतीने काम, धोका पत्करून रस्ता ओलांडण्याची वेळ

Tata Motors: टाटा मोटर्सचा शेअर 40 टक्क्यांनी घसरला; शेअर बाजारात नेमकं काय घडलं?

Kolhapur Youth Accident : आयुष्याचा शेवट एका स्पीड ब्रेकरमुळे झाला, २४ सत्यजित बाबतीत घडलं विपरीत

Nashik Crime : भद्रकाली पोलिसांची मोठी कारवाई! १८ गुन्हे दाखल असलेल्या तडीपार सागर कुमावतला वणी गडावरून घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT