Rohit-Sharma
Rohit-Sharma 
क्रीडा

रोहितने मोडला द्रविडचा विक्रम; ब्रॅडमन यांच्या पंगतीत स्थान

विराज भागवत

Ind vs Eng 4th Test: हिटमॅनने इंग्लंडमध्ये ठोकलं दमदार कसोटी शतक

Ind vs Eng 4th Test: इंग्लंडविरूद्धच्या (England) चौथ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताने (Team India) सामन्यात आघाडी घेतली. पहिला दिवस गोलंदाजांसाठी पोषक होता. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून फलंदाजांचा वरचष्मा दिसून आला. इंग्लंडच्या ओली पोप (Ollie Pope) आणि ख्रिस वोक्सने दुसरा दिवस गाजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी भारताचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने दमदार शतक ठोकलं. भारताबाहेरील हे त्याचे कसोटी क्रिकेटमधले पहिलेच शतक (First Overseas Test Century) ठरले. त्यासोबत त्याने आणखी एक विक्रमही केला. (Sports News)

रोहितने दमदार खेळी करत आपलं विदेशी भूमीवरील पहिलं कसोटी शतक झळकावलं. या मालिकेत दोन वेळा त्याने अर्धशतक पूर्ण केलं होतं पण त्याला शतकापर्यंत पोहोचता आलं नव्हतं. पण चौथ्या कसोटीत त्याने ती कसर भरून काढली. रोहितने १४ चौकार आणि १ षटकार लगावत २५६ चेंडूत १२७ धावांची खेळी केली. रोहितने इंग्लंडमध्ये एकूण नववे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. (Indian Batsman with Most Tons in England) त्यासोबतच त्याने महान फलंदाज राहुल द्रविड याच्या इंग्लंडमधील ८ शतकांच्या विक्रमाला मागे टाकले. विशेष बाब म्हणजे, रोहितने एकूण ९ शतकांपैकी ८ शतके ही २०१८ ते २०२१ या कालावधीत ठोकली आहेत. इंग्लंडमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा जागतिक विक्रम ऑस्ट्रेलियाच्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावे आहे.

दरम्यान, पहिल्या डावात इंग्लंडने ९९ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवात चांगली झाली. लोकेश ४६ धावांवर बाद झाला. पण पुजाराच्या साथीने रोहितने गाडी पुढे नेली. रोहितने दमदार शतक ठोकलं. तर पुजाराने झुंजार अर्धशतकाला गवसणी घातली. त्यानंतर कर्णधार विराट कोहली (२२*) आणि रविंद्र जाडेजा (९*) यांनी खेळ थांबेपर्यंत खेळपट्ट सांभाळली. खराब प्रकाशामुळे खेळ काही षटके आधीच बंद करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT